एक्स्प्लोर
ज्यांच्याकडे काळा पैसा, त्यांनाच चिंता करण्याची गरज : मुख्यमंत्री
औरंगाबाद : "पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. मात्र या निर्णयामुळे कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी कायदेशीररित्या कमावलेला सगळा पैसा सुरक्षित आहे. पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनाच चिंता करण्याची गरज आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
500-1000 च्या नोटा चलनातून बंद
काळा पैशाला आळा घालण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. मंगळवार (8 नोव्हेंबर 2016) च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात येतील.
काळा पैसा असणाऱ्यांनाच चिंतेची गरज
मुख्यमंत्री म्हणाले की, "देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने नोटा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनाच चिंता करण्याची गरज आहे."
बँका सुरु झाल्यावर अडचणी संपतील!
"बँकांचे व्यवहार सुरु झाल्यावर सर्व अडचणी संपतील. परंतु सध्या चेक, क्रेडिट आणि डेबिट कार्डने कितीही रुपयांचा व्यवहार करता येईल. याशिवाय शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीतून मिळालेला पैसा वाया जाणार नाही. त्यांच्या सर्व नोटा बँकेत बदलून मिळणार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही," असा दिलासाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
टोलनाक्यावर अडवणूक होणार नाही : मुख्यमंत्री
टोल नाक्यावर नागरिकांची अडवणूक होणार नाही, अशी सूचना टोलवरील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. टोलवरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.एका मोठ्या ध्येयाकडे जात असताना लोकांना थोडा त्रास सहन करावा लागेस, असं पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement