एक्स्प्लोर

जानकर थोडं मोठ्यानं बोलतात, पण बिचारे सज्जन आहेत: मुख्यमंत्री

नागपूर: विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान आज महादेव जानकर यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. काँग्रेस-राष्ट्रवादीनं सभागृहाबाहेर आणि सभागृहाच्या आतही निदर्शनं केली. महादेव जानकर यांनी आचारसंहितेचा भंग करुन आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. काही दिवसांपूर्वी फोनवरुन एका निवडणूक अधिकाऱ्याला दमदाटी करतानाचा जानकरांचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान, याप्रकरणी जानकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. विधीमंडळात विरोधकांनी जानकरांच्या राजीनाम्याप्रकरणी बराच गोंधळ घातला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा बचाव केल्याचं पाहायला मिळालं. 'महादेव जानकर बिचारे, सज्जन आहेत. माणूस म्हणून चांगले आहेत. पण  थोडं मोठ्यानं बोलतात. एवढ्या घाईने त्यांचा राजीनामा मागणं हा त्यांच्यावर अन्याय होईल.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जानकरांचा बचाव केला. mahadev-jankar-580x395 काय आहे नेमकं प्रकरण? गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली होती. शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनाही यावेळी जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिल्या. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे वृत्त वाहिन्यांवरुनही प्रसारित झाले. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत, जानकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. VIDEO: संबंधित बातम्या: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन महादेव जानकरांवर गुन्हा दाखल दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांना निवडणूक आयोगाची नोटीस निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव नव्हे, विनंती केली, जानकरांचं स्पष्टीकरण काँग्रेसचा अर्ज बाद करायचा, महादेव जानकरांचा व्हिडीओ व्हायरल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget