एक्स्प्लोर

काम करताना चूक होईल, पण बेईमानी नाही : फडणवीस

शेतकऱ्यांसाठी हमीभाव तयार करताना उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

रायगड : आमच्यासाठी सत्ता हे सेवेचे साधन आहे. काम करताना चूक झाली तरी बेईमानी होणार नाही. प्रामाणिकपणे काम करत राज्याला सर्वोच्च शिखरावर नेण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील एका कार्यक्रमात बोलत होते. पुढील 10 ते 15 वर्षे विरोधी पक्ष सरकारमध्ये येण्याची शक्यता नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आज कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देवेंद्र साटम यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळेस बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. “15 वर्षे या राज्यातील सरकारने लूट केली असून राष्ट्रवादी काँग्रेसची 'जल बिन मच्छली' अशी अवस्था झाली आहे. 'हल्लाबोल यात्रे'सारख्या यात्रांची सवय ठेवणे गरजेचे असून पुढील 10 ते 15 वर्षे त्यांना सरकारमध्ये येण्याची शक्यता नाही. 15 वर्षे केलेल्या पापाचे भोग भोगावे लागणार आहेत.”, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर, शेतकऱ्यांसाठी हमीभाव तयार करताना उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले एमएमआरडीएचा विस्तार हा प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात होणार असून या प्रगतीला साथ देण्याचं काम राज्य सरकार करीत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर जिल्ह्यातील सर्व कामांना चालना देण्याचं काम राज्य सरकार मार्फत करण्यात येणार असून पेण अर्बन बँकेच्या नैनामध्ये येणाऱ्या जमिनी संपादन करुन पैसे फेडून बँकेला देऊन खातेदाराचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस

Embed widget