इंद्रायणी नदी पुलाला 8 कोटी मंजूर झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फक्त 80 हजारांचे पत्रच दाखवलं! म्हणाले, एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलं जात आहे
संजय राऊत यांनी तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे पत्र सोशल मीडियात पोस्ट केलं असून यामध्ये दुरुस्तीसाठी अवघ्या 80 हजारांची तरतूद करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Indrayani Kundmala bridge collapse: पुणे जिल्ह्यातील मावळ तहसीलमधील कुंडमाळा गावाजवळ रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील (Indrayani Kundmala bridge collapse) पूल कोसळला. घटनास्थळी या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जण जखमी आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी 51 जणांना वाचवले आहे. काही लोक अजूनही बेपत्ता आहेत. कुंडमळा दुर्घटनेतील मृतांची नावे चंद्रकांत गुनाजी साठले (४५, रा. वानवडी, हडपसर), रोहित सुधीर माने (३१), विहान रोहित माने (५, दोघे रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड), चेतन आण्णाप्पा चावरे (२३, रा. इंद्रायणी काॅलनी, तळेगाव दाभाडे, मूळ रा. नसलापूर, ता. रायबाग, जि. बेळगाव) अशी आहेत.
पुलाच्या दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी अवघ्या 80 हजारांची तरतूद?
दरम्यान, जीर्ण झालेला पूल कोसळल्यानंतर पुलाच्या स्थिीतीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पूल कोसळल्यानंतर आता हा पूल बांधण्यात येणार होता आणि त्यासाठी 8 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे पत्र सोशल मीडियात पोस्ट केलं असून यामध्ये दुरुस्तीसाठी अवघ्या 80 हजारांची तरतूद करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
इंद्रायणी नदीत पूल कोसळून किमान ४० जण वाहून गेले.
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 16, 2025
या पुलासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते म्हणतात;
संबधित मंत्र्याचे पत्र पहा,
एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मुर्ख बनवले जात आहे
फडणवीसांचे राज्य आहे,चालायचेच!
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks pic.twitter.com/Blbupinujf
किंवा जनतेला मुर्ख बनवले जात आहे
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, इंद्रायणी नदीत पूल कोसळून किमान 40 जण वाहून गेले. या पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते म्हणतात; संबधित मंत्र्याचे पत्र पहा, एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मुर्ख बनवले जात आहे. फडणवीसांचे राज्य आहे,चालायचेच! संजय राऊत यांनी पत्र समोर आणल्यानंतर आता पुन्हा एकदा पुलावरून आरोप प्रत्यारोप होण्याची चिन्हे आहेत.
पूल जीर्ण झाला होता, क्षमतेपेक्षा जास्त लोक
दरम्यान, पर्यटनासाठी आलेले पर्यटक पुलावर उभे असतानाच हा अपघात झाला.अपघाताचे ठिकाण पुण्यापासून 30 किमी अंतरावर आहे, लोक वीकेंड साजरा करण्यासाठी येतात. पुण्यापासून कुंडमाळा हे अंतर 30 किमी आहे. मुंबईकडे जाताना एक्सप्रेस वेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हे ठिकाण आहे. वीकेंडला हजारो लोक येथे येतात. सुरुवातीच्या माहितीनुसार, हा पूल आधीच खूपच वाईट आणि जीर्ण अवस्थेत होता. अपघात झाला तेव्हा पुलावर क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक होते. लोक दुचाकी आणि मोटारसायकली घेऊन जात होते. त्यामुळे पुलाला भार सहन होत नव्हता.
इतर महत्वाच्या बातम्या























