एक्स्प्लोर
उड्डाणपुलासाठी थेट शिवाजी महाराजांना निवेदन
अहमदनगरमध्ये आज रसिक ग्रुप आणि नागरकरांच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याची प्रशासनाला सद्बुद्धी मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालण्यात आले.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये आज रसिक ग्रुप आणि नागरकरांच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याची प्रशासनाला सद्बुद्धी मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालण्यात आले.
नगर शहरामधील औरंगाबाद आणि पुण्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल बांधावा अशी मागणी नगरवासी गेल्या 20 वर्षांपासून करत आहेत. परंतु ही मागणी अद्याप मान्य झालेली नाही. त्यामुळे उड्डाणपूल बांधण्याची मागणी प्रशासनाने पूर्ण करावी याची प्रशासनाला सद्बुद्धी द्यावी यासाठी नागरिकांनी थेट शिवरायांना निवेदन दिले आहे.
नगरमधल्या मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल नसल्याने या रस्त्यावर आतापर्यंत कित्येक अपघात झाले आहेत. अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरीही लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने लोकांची मागणी मान्य व्हावी याकरिता नागरिकांनी हे अनोखे आंदोलन केले.
अहमदनगरमधील नागरिकांनी या रस्त्यावर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून त्यांना साकडे घातले. सरकारला लवकरात जाग येऊन उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी यावेळी शिवाजी महाराजांपुढे मांडण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
राजकारण
क्रिकेट
Advertisement