एक्स्प्लोर
'कोल्डप्ले'च्या कार्यक्रमात तिरंग्याचा अपमान, नवाब मलिकांचा आरोप

मुंबई : जगप्रसिद्ध कोल्डप्लेच्या मुंबईतील कार्यक्रमात भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. गायक ख्रिस मार्टिनने तिरंगा खिशात खोचला होता. ज्यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीसह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही राष्ट्रध्वजाचा अपमान झाला असल्याचं म्हटलं आहे. ट्विटरद्वारे त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. https://twitter.com/nawabmalikncp/status/800026104652120064 'वंदे मातरम'च्या थीमवर ख्रिस मार्टिनने गाणं सादर करताना तिरंगा कंबरले खोवला होता. त्यानंतर तिरंगा भिरकावण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. शिवाय सोशल मीडियातनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर तिरंग्याचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. https://twitter.com/nawabmalikncp/status/800024422614634497 https://twitter.com/nawabmalikncp/status/800024345334587393
आणखी वाचा























