एक्स्प्लोर

BJP : चित्रा वाघ, पोहरादेवीचे महंत आजच आमदारकीची शपथ घेणार? आचारसंहितेपूर्वी भाजपची राज्यपाल नियुक्त आमदारांची 3 नावं ठरली 

Governer Nominated MLC : महायुती सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदाराकीसाठी 7 नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांचा शपथविधी आचारसंहितेपूर्वीच होण्याची शक्यता आहे. 

मुंबई : राज्यातल्या विधानसभेसाठी मंगळवारी आचारसंहिता लागणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीची तयारीही सुरू असल्याची माहिती आहे. भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज यांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. हे नेते मंगळवारी सकाळीच आमदारकीची शपथही घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत शिंदे गटातील दोन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेतेही आमदारकीची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंगळवारी सकाळीच शपथविधी होणार 

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी केवळ 7 जणांची नावं राज्यपालांकडे देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये भाजपला 3, राष्ट्रवादीला 2 आणि शिवसेनेला 2 जागा दिल्याची सूत्रांची माहिती आहे.  भाजपकडून महामंत्री विक्रांत पाटील, चित्रा वाघ आणि पोहरादेवीचे महंत बाबूसिंग महाराज यांना संधी देण्यात येणार आल्याची माहिती आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्यासह आणखी एका नेत्याला संधी देण्यात येणार आहे. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलीय. उद्याच या संभाव्य आमदारांचा शपथविधी होण्याचीही शक्यता आहे.

रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम

राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपदही पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांना त्या पदावर पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. 

बाबूसिंग महाराज यांना मुंबईला येण्याचे निर्देश

बंजारा समाजाचे महंत आणि पोहरादेवीचे पीठाधीश बाबूसिंग महाराज यांचं नाव या यादीत आहे. बाबूसिंग महाराज यांनी  या बातमीची पुष्टी केली असून भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे मुंबईला येण्याचा निरोप दिल्याची माहिती त्यांनी दिली. मंगळवारी 12 वाजेपर्यंत आपण मुंबईला पोहचणार असल्याचं महंत बाबूसिंग महाराज यांनी एबीपी माझाला सांगितलं.

दिल्लीतील बैठक आटोपली, भाजप नेते मुंबईकडे रवाना

भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांची सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये पक्षाचे सर्व कोअर गटाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा अमित शाह, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान बैठक झाली. तिसरी बैठक देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, आशिष शेलार यांच्या दरम्यान झाली. या सर्व बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबईकडे रवाना झाले. 

ही बातमी वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Shinde Statement On Walmik Karad : वाल्मिक कराडचे 'कर्म'काडं उघड, अवादा कंपनीच्या सुनील शिंदेंच्या जबाबात काय?100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 11 March 2025 : 6 PMABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 11 March 2025Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 :  ABP Majha : 5 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
पुणे महापालिकेची मोठी कारवाई; पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या 50 मिळकती जप्त, एकाचा लिलाव होणार?
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
Embed widget