एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी चांगल्या लोकांची नियुक्ती करावी : विनायक मेटे

अशोक चव्हाण आणि त्यांच्या बाजूला असलेल्या लोकांनी राजकारण केल्याने मराठा समाजावर वाईट परिस्थिती आली आहे. समाजात अशोक चव्हाण यांच्यावर रोष असल्याने मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना बोलावण्यात आले नाही, असे मेटे म्हणाले.

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा असली, तरी अशोक चव्हाणांसह काही लोकांना मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी इच्छा नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना सोबत घेत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांना सोबत न घेता, चांगल्या लोकांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच मराठा अरक्षणासोबत मुस्लिम आणि धनगर आरक्षणाची मागणीही यावेळी संघटनेने केली. गरीब ब्राम्हण समाजालादेखील न्याय मिळावा, यासाठी संघटना आग्रही असल्याचेही ते म्हणाले.

विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला माजी आमदार आणि संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

मराठा समाज तुमच्यामागे उभा राहिला, त्यांच्या जीवावर राजकारण केले. आज पंतप्रधान पदाची स्वप्न पाहत आहात. मात्र, मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय केले. घरचे प्रश्न सोडवताना विविध समाजाचे प्रश्न का सोडवले नाहीत. या प्रश्नांकडे लक्ष द्या, अन्यथा लोक तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका विनायक मेटे यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली.

अशोक चव्हाण आणि त्यांच्या बाजूला असलेल्या लोकांनी राजकारण केल्याने मराठा समाजावर वाईट परिस्थिती आली आहे. समाजात अशोक चव्हाण यांच्यावर रोष असल्याने मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना बोलावण्यात आले नाही. मुख्यमंत्र्यांनी चांगले निर्णय घेतले, मात्र हे निर्णय आम्हाला डावलून घेतले, असे चव्हाण आणि चमुला वाटते. म्हणून आमच्याबाबत काही चुकीच्या बातम्या पेरल्या, असा आरोप देखील मेटे यांनी केला.

संभाजीनगरचा मुद्दा 'सामना' मधून ठरवू नका 

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करा, या मागणीवरून राजकारण केले जात आहे. नाव बदलणे हा विषय सर्वस्वी शिवसेनेचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेली भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी. ती भूमिका सामनामधून किंवा सीएमओच्या ट्विटर अकाउंट वरून जाहीर करू नये. त्यांचे नोटिफिकेशन काढावे. त्यानंतर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची भूमिका विचारावी. त्यानंतर राष्ट्रवादीची भूमिका जाहीर करावी. त्यानंतर शिवसेना बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणार की, सत्तेची लाचारी स्वीकारणार हे बघायला मिळेल. तसेच निवडणुकीच्या तोंडावर शहराचे नाव बदलण्याचा मुद्दा काढला जात आहे. महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदू आणि मुस्लिम समाजात फूट पडण्याचा प्रयत्न करू नका, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP MajhaAjit Pawar Meet Sharad Pawar : काका-पुतण्या भेट, परिवर्तन घडणार?D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Embed widget