दहशतवाद्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांची धडकी भरणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ कुपवाडा येथे दाखल
सैन्यदलाकडून छत्रपतींच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपतींच्या पुतळ्यामुळे सैन्याचे मनोबल उंचावणार आहे.
मुंबई : दहशतवाद्यांच्या मनात आता छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) धडकी भरणार आहेय जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा दाखल झाला आहे. राज्यपालांच्या हस्ते पूजन झालेला छत्रपतींचा पुतळा कुपवाडा येथे दाखल झाला. वाजत-गाजत भारतीय जवानांकडून छत्रपतींच्या पुतळ्याचे स्वागत करण्यात आले.
जम्मू आणि काश्मीर सीमेवर कुपवाडा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून “आम्ही पुणेकर” या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात येत आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत साडे दहा फूट उंचीच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. सैन्यदलाकडून छत्रपतींच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. छत्रपतींच्या पुतळ्यामुळे सैन्याचे मनोबल उंचावणार आहे.
‘आम्ही पुणेकर’ या संस्थेकडून हा पुतळा उभारण्यात आला
जम्मू आणि काश्मीर सीमेवर कुपवाडा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून निवासी आयुक्त आणि प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कुपवाड्याकडे रवाना करण्यात आला. हा पुतळा राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 20 ऑक्टोबरला मुंबईतून रवाना झाला होता. मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेकडून हा पुतळा उभारण्यात आला आहे
भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल."
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास ही आपली प्रेरणा
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले रक्षणकर्ते आहेत. त्यांच्या शौर्याचा इतिहास ही आपली प्रेरणा आहे. त्यातूनच आपण शिवछत्रपतींच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन वर्षात आग्रा येथे आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. विविध उपक्रम राबविले. शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार आपण केला. ही अभिमानाची बाब आहे. ती राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील. आपले सण, उत्सव अधिक उत्साहाने साजरे केले. आपली संस्कृती, परंपरा जोपासण्याचा, वाढविण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.