एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई-नाशकातील छगन भुजबळांच्या 22 मालमत्तांवर टाच
मुंबई/नाशिक : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीनं छगन भुजबळ यांची मालमत्ता जप्त करण्याचा धडाका लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच भुजबळांच्या 22 मालमत्तांवर टाच आली आहे.
यामध्ये मुंबईसह नाशिकमधल्या आलिशान फार्म हाऊसचाही समावेश आहे. नाशिकच्या जय इलेट्रॉनिक्स, शिलापूर येथील जमीन, एमईटीसमोरील जमीन, दिंडोरीतील शेतजमिनीसह भुजबळ फार्मचाही समावेश आहे.
भुजबळ फार्ममधील साडेतीन एकर जागा ही भुजबळांची वडिलोपार्जित जागा आहे, तर उर्वरित जागा त्यांनी नव्याने विकत घेऊन त्यावर आलिशान महाल उभा केला आहे. हा महाल व त्यांच्या कार्यालयाची जागा जप्त केली असून हे बेहिशेबी पैशांतून बांधल्याचा ईडीचा आरोप आहे.
भुजबळांचा नाशिकमधील एकमेव निवाराही जप्त झाल्याने भुजबळ नाशिकमधून बेघर झाल्याची चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाम खातं असताना ठेकेदारांकडून जवळपास 780 कोटींचा लाभ घेत या पैशातून त्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप भुजबळांवर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement