एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : हा कसला तुमचा नेता? मला मराठा समाजाची कीव येते; मनोज जरागेंच्या वक्तव्यावरून भुजबळांनी डिवचले

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : अहमदनगरमधील ओबीसी मेळाव्यातून ओबीसीसाठी लढणार असल्याचे सांगितल्याने मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. 

अहमदनगर : जिथं ओबीसी लोक राहतात, तिथं दहशत निर्माण केली जात आहे, त्यांना मारहाण केली जात आहेत.  लोक गाव सोडून जात आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. अहमदनगरमध्ये ओबीसी मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला. आपण 16 नोव्हेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर 17 नोव्हेंबरला अंबडच्या रॅलीला हजेरी लावली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वाच्यता करू नये, असे सांगितल्याने मी अडीच ते तीन महिने शांत राहिलो, असा दावाही यांनी ओबीसी रॅलीतून केला. भुजबळ यांनी राजीनामा पक्षाकडे सादर केला की मुख्यमंत्र्यांकडे दिला? याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही. या मेळाव्यातून ओबीसीसाठी लढणार असल्याचे सांगितल्याने मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. 

मराठा समाजाच्या नेत्यांची कीव येते, काय बोलतो तुमचा नेता?

छगन भुजबळ म्हणाले की,  मराठा आमदारांना मते मिळणार नाही म्हणून मराठा आमदार घाबरतात. आमचे लोक रॅलीला येत नाही पण मतदान करत नाहीत. निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये आरक्षणावर बोलल्या नाहीत, मला वाईट वाटले. मराठा समाजाच्या नेत्यांची कीव येते, काय बोलतो तुमचा नेता? जरांगे यांनी मला बजेटमधील फारसं कळत नाही, पण आरक्षण देता येत असल्यास द्यावे, असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्याची भुजबळांनी ओबीसी रॅलीतून खिल्ली उडवली. 

त्यांनी पुढे सांगितले की, न्हावी समाजाच्या दुकानात जायचं नाही, असं ठरवलं आहे.  सर्व नाभिक समाजाने सुद्धा एकही मराठा समाजाची भादरायची नाही. आपापसात भादरवून टाका म्हणावे. फडणवीस साहेब तुमचा खात्याचा भेदभाव चांगला नाही. रात्री दोन ते तीनवाजेपर्यंत सभा हे काय सुरू आहे, असेही ते म्हणाले.  गावागावांमध्ये ओबीसींना त्रास दिला जातो तक्रार होत नाही. 

एका बाजूने ओबीसी आरक्षण घ्यायचे आणि मंडल आयोग संपवायचा, अरे मंडल आयोग गेला तर हे आरक्षण राहील का? असा सवाल भुजबळ यांनी जरांगे यांनी केला. माळी साळी असे भेदभाव सोडून सर्वानी एकत्र राहिलं पाहिजे.  

तर परत उपोषण कशासाठी? छगन भुजबळांचा मनोज जरागेंना सवाल 

छगन भुजबळ म्हणाले की, नाभिक समाजाच्या कर्पुरी ठाकुरांना भारतरत्न दिला, यासाठी पीएम मोदींचे अभिनंदन करतो. मोदींनी ओबीसी ऋण मान्य केलं. ते पुढे म्हणाले की, 27 तारखेला गुलाल उधळला, तर परत उपोषण कशासाठी? अशी विचारणा भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. अध्यादेश कळत नाही, अधिसूचनेचा मसूदा कळत नाही आणि म्हणतात आरक्षण मिळालं, अशी टीका त्यांनी केली. 

तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? 

मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन  छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांनाच आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Embed widget