एक्स्प्लोर

महाराष्ट्रापेक्षा स्वस्त पेट्रोल, कर्नाटकात नाकावर टिच्चून बोर्ड झळकले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अनेक पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध अशा आशयाचे फलक लावण्यात येत आहेत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील निप्पाणी जवळच्या एका पेट्रोलपंप चालकाने अशाप्रकारचे फलक लावले आहेत सोशल मीडियातूनही यावरुन चांगलीच चर्चा रंगत आहे.

मुंबई : सध्या संपूर्ण देशात पेट्रोल दरांवरुन मोठा गोंधळ सुरु आहे. विरोधकांकडून यावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर पेट्रोल दरावरुन नेटीझन्सकडूनही मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यातच कर्नाटककडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अनेक पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध अशा आशयाचे फलक लावण्यात येत आहेत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील निप्पाणी जवळच्या एका पेट्रोलपंप चालकाने अशाप्रकारचे फलक लावले आहेत सोशल मीडियातूनही यावरुन चांगलीच चर्चा रंगत आहे. सध्या देशात पेट्रोल दरावरुन वातावरण तापलेलं असताना, दुसरीकडे राज्य सरकारने इंधनावर 11 रुपये अतिरिक्त कर लावला. त्यामुळे राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर अजून वाढले आहेत. पण कर्नाटक सीमेवरील निप्पाणीतील पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा स्वस्त दरात पेट्रोल उपल्बध अशा आशयाचे फलक लावले आहेत. त्यामुळे हे फलक लावून महाराष्ट्रातील जनतेला डिवचल्याची भावना व्यक्त होत आहे. सध्या मुंबईत पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा गाठला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात दुष्काळी कराचा समावेश करुन सरासरी 75 रुपयानी पेट्रोल मिळत आहे. यातील 11 रुपये कमी झाले, तर फक्त 64 रुपयाने तुम्हाला पेट्रोल मिळू शकेल, अशी भावना महाराष्ट्रात आहे. पण, त्यातच कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल दराचे फलक लावण्यात आल्याने महाराष्ट्रातील जनतेला खिजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या फलकांमध्ये महाराष्ट्रापेक्षा 3.50 रुपये कमी दराने डिझेल, तर 9 रुपये कमी दराने पेट्रोल मिळेल असं सांगितलं जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील निप्पाणीतील लक्ष्मी ट्रेडीग कंपनी या पेट्रोल वितरकाने याबाबतचे फलक महामार्गावर लावले आहेत. संबंधित बातम्या महाराष्ट्र तुडुंब असताना पेट्रोलवर 11 रुपये दुष्काळ कर

महत्त्वाच्या बातम्या

कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: 'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली
'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget