एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएमध्ये येणार का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : 2014 ते 2019 मध्ये फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या मनाप्रमाणेच अनेक निर्णय करत होते. याचा मी स्वतः साक्षीदार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Chandrashekhar Bawankule : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा देशभर मोर्चेबांधणी करत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अनेक लहान-मोठे पक्ष एनडीएत सहभागी होत आहेत. त्यामुळे देशात एनडीएची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. तर नितीश कुमार (Nitish Kumar) हेदेखील एनडीएत सहभागी झाले आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एनडीएमध्ये (NDA) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केले आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी उद्धव ठाकरे परत एनडीएमध्ये येऊ शकतात का? असे विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका केली आहे. त्यामुळे आमची मन दुखावली गेली आहेत. 2014 ते 19 मध्ये फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या मनाप्रमाणेच अनेक निर्णय करत होते. याचा मी स्वतः साक्षीदार आहे, असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

5 मार्चला राष्ट्रीय नमो युवा संमेलन

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 5 मार्चला राष्ट्रीय नमो युवा संमेलन होणार आहे. जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व आमदार यावेळी उपस्थित राहतील. राज्यभरातून 18 ते 35 वयोगटातील एक लाख तरुण उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात मोदी सरकारने तरुणांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली जाईल, तसेच या संमेलनात आलेल्या तरुणांचे मत, सूचना घेऊन आम्ही भाजपच्या लोकसभेच्या संकल्प पत्रासाठी (घोषणापत्र) त्या सूचना केंद्रीय भाजप नेतृत्वाकडे पाठवणार आहोत. सर्व तरुणांना विनंती आहे की, त्यांनी या नमो युवा संमेलनात सहभागी व्हावे. 

5 मार्चला अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

5 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघाच्या तयारीचा आढावा घेणार आहे. अकोल्यात होणारी बैठक ही क्लस्टरची बैठक असणार आहे. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून 71 प्रतिनिधी सहभागी होतील. त्याच दिवशी त्यांची दुपारी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र युवा संमेलन आणि संध्याकाळी संभाजीनगर येथे जनसंवाद सभा ही होणार आहे. 6 मार्च रोजी पीएम मोदी नारी वंदन महिला संमेलनात ऑनलाईन बोलतील. या ऑनलाईन संमेलनात प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील 5 हजार महिला सहभागी होतील. महाराष्ट्रातून एकाच वेळेस 15 लाख महिला या ऑनलाइन महिला संमेलनात सहभागी होतील. 7 मार्च ते 15 मार्च दरम्यान प्रत्येक गावात भाजपचा खास बॉक्स पाठवू आणि सूचना घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. 

रामदास कदम यांचे मत म्हणजे युतीचे मत नाही

तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून एकट्या भाजपाला जिवंत राहायचं आहे का? असा सवाल रामदास कदम यांनी भाजपला विचारला. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,   रामदास कदम जे बोलले आहे, त्याबद्दल एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील. रामदास कदम यांचे मत म्हणजे युतीचे मत नाही. महायुतीमध्ये सर्व पक्ष सलोखा ठेवण्याची जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे रामदास कदम यांच्या वक्तव्याची योग्य दखल घेतील. भाजप नेहमीच सहकारी पक्षांची काळजी घेते. अटल बिहारी आणि मोदींचे एनडीए सरकार असो किंवा फडणवीस यांच्या सरकारमध्येही घटक पक्षांची काळजी घेतली होती, मंत्री पद ही दिले होते, असे त्यांनी म्हटले आहे. 

महायुतीत सर्व पक्ष आपापल्या चिन्हावर लढतील

शिवसेनेचे काही उमेदवार कमळावर निवडणूक लढवतील का? असे विचारले असता बावनकुळे म्हणाले की, महायुतीत भाजपचे सर्व उमेदवार कमळावर, शिवसेनेचे उमेदवार तीर कमानवर, राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळवर निवडणूक लढवतील, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या सर्व वर्तमान खासदारांना उमेदवारी मिळेल का? असे विचारले असता ते म्हणाले की, उमेदवार ठरवण्याचा अधिकार मला नाही. शिवसेनेचे उमेदवार शिंदे ठरवतील, असे बावनकुळे यांनी म्हटले.  

आणखी वाचा

Maharashtra Politics : मोठी बातमी! विजय शिवतारे अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत, बारामतीत मोठा निर्णय जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget