एक्स्प्लोर

दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत 'जाणता राजा' किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावं, चंद्रकांत पाटलांचं पवारांना खुलं आव्हान

लोकांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी मी दुष्काळासंदर्भात उपाययोजनांची आकडेवारी मांडतोय आणि या आकडेवारीची चौकात चर्चा करायला तयार आहे, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

सोलापूर : सरकारने दुष्काळासंदर्भात जे काम केलं आहे, त्यासंबंधीची आकडेवारी मी सर्वांसमोर मांडतो. या आकडेवारी संदर्भात कोणीही चौकात चर्चा करायला बोलवलं तरी मी तयार आहे, मग ते जाणता राजा असो किंवा त्यांचा कोणी पंटर, असं म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खुलं आव्हान दिलं आहे. ते सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळ दौऱ्यात बोलत होते. काही जण आपल्या राजकीय स्वार्थासाठी संभ्रम निर्माण करत आहेत. संभ्रम निर्माण करुन सामान्य माणसाला विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत सामान्यांना उभारी द्यायची असते, मात्र काही जण सामान्यांना विचलित करतात, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. लोकांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी मी ही आकडेवारी मांडतोय आणि या आकडेवारीची चौकात चर्चा करायला तयार आहे. मग या चर्चेसाठी जाणता राजाने यावं किंवा त्यांच्या कोणी पंटरने यावं, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी पवारांना खुलं आव्हान दिलं. लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याचं मतदान संपताच महाराष्ट्रातील अनेक नेते दुष्काळ दौरे करत आहेत. शरद पवार यांनीही सांगोल्यात दुष्काळ पाहणी दौरा केला. दुष्काळ दौऱ्यात शरद पवारांनी शासनावर टीका केली. याच टीकांना प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना खुलं आव्हान दिलं. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज दुष्काळाची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी मोहोळ तालुक्यातील देवडी गावाला भेट देत दुष्काळाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शासनाने केलेल्या उपाय योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी 1300 छावण्या सुरु झाल्या असून 8.5 लाख जनावरांचा चारा छावणीत आहे. तसेच धरणांच्या बॅकवॉटरवर 1 लाख एकर जमिनीवर चारा लावला, जो जूनपर्यंत पुरेल, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान शासन दुष्काळी परिस्थिती सामना करण्यासाठी सर्व शक्तीने प्रयत्न करत असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावती विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, काँग्रेसचा उमेदवार गायब झाल्याची चर्चा अन् आता थेट रुग्णालयात... नेमकं काय घडलं?
अमरावती विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, काँग्रेसचा उमेदवार गायब झाल्याची चर्चा अन् आता थेट रुग्णालयात... नेमकं काय घडलं?
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून QR कोड ओळखपत्रांचे वाटप; कितीजण पात्र ठरले?
मुंबईतील फेरीवाल्यांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून QR कोड ओळखपत्रांचे वाटप; कितीजण पात्र ठरले?
Raju Shetti Shakti Peeth Sangli: 'खाकी वर्दीतील दरोडेखोर, जनरल डायरच्या औलादी!' शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीत जमीन मोजणीवरून राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल, म्हणाले, 'रात्री २ वाजल्यापासून पोलिसांचा पहारा...'
'खाकी वर्दीतील दरोडेखोर, जनरल डायरच्या औलादी!' शक्तीपीठ महामार्गासाठी सांगलीत जमीन मोजणीवरून राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल, म्हणाले, 'रात्री २ वाजल्यापासून पोलिसांचा पहारा...'
Maharashtra Live blog updates: विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, उर्वरित शाळा 15 जूनपासून; शिक्षण विभागाकडून निर्णयात बदल
Maharashtra Live blog updates: विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, उर्वरित शाळा 15 जूनपासून; शिक्षण विभागाकडून निर्णयात बदल

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navale Bridge Accident : मध्यरात्री नवले पुलावर थरारक अपघात; सिमेंट टँकर थेट दुचाकीवर उलटला अन् 'मृत्यूचं तांडव'
मध्यरात्री नवले पुलावर थरारक अपघात; सिमेंट टँकर थेट दुचाकीवर उलटला अन् 'मृत्यूचं तांडव'
MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
Maharashtra School: राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
America missile attack on Iran: इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं, अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा, युद्ध पुन्हा भडकणार?
इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं, अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा, युद्ध पुन्हा भडकणार?
Vasai Crime News: इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार, रात्री 10.45 वाजता काय घडलं?
इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार
Maharashtra Live blog updates: विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, उर्वरित शाळा 15 जूनपासून; शिक्षण विभागाकडून निर्णयात बदल
Maharashtra Live blog updates: विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, उर्वरित शाळा 15 जूनपासून; शिक्षण विभागाकडून निर्णयात बदल
Financial Freedom : आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
आजच नोकरीपासून कायमची सुटका! जाणून घ्या तुमचा 'फ्रीडम नंबर'; अफाट पैसा कमावून निवृत्ती घेण्याचं सोपं गणित
Gold vs US Dollar : आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
आपण सोनं खरेदी करतो तेव्हा अमेरिकन डॉलर कमकुवत होतो का? समजून घ्या यामागचं चक्रव्यूह!
Embed widget