एक्स्प्लोर

राग माणसावर काढा, पक्षावर नको, चंद्रकांत पाटलांकडून खडसे-पंकजांची समजूत काढण्याचा प्रयत्न

गोपीनाथगडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी घरातले वाद घरातच मिटवले पाहिजे असं वक्तव्य केलंय. कारण आपण घरातले वाद रस्त्यावर येऊ देत नाही. सोबतच व्यक्तीवर राग असू शकतो पक्षावर राग ठेवू नका अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंना मनवण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या नाराजीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीनाथगडावर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चुका माणसांकडून होतात. त्याचा राग पक्षावर कशाला काढता, अशा शब्दात पाटलांनी दोन्ही नाराज नेत्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या वेदना, खंत समजू शकतो. पक्ष त्याची दखल घेईल, असा शब्द पाटलांनी दिला. त्याचबरोबर मराठी शब्द जरा जपून वापरा, उद्या सगळं ठिक झाल्यावर आपल्याला अपराधी वाटायला नको, अशा शब्दात पाटील यांनी खडसे आणि पंकजांना समजावून सांगितलं. गोपीनाथगडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी घरातले वाद घरातच मिटवले पाहिजे असं वक्तव्य केलंय. कारण आपण घरातले वाद रस्त्यावर येऊ देत नाही. सोबतच व्यक्तीवर राग असू शकतो पक्षावर राग ठेवू नका अशा शब्दात त्यांनी पंकजा मुंडेंना मनवण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मेळाव्याआधी गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, हरिभाऊ बागडे यांनीही गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलंय. मात्र, त्याआधी पंकजा मुंडे यांच्या परळीतील यशश्री बंगल्यावर बंद दाराआड चर्चा झाली. चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि पंकजा मुंडे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील म्हणाले, नाथाभाऊ तुम्ही जाण्याची किंवा स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा करु नका. पक्षाच्या चुका झाल्या नाहीत. चुका माणसांच्या झाल्यात. पक्षावर कशाला राग काढताय. उलट तुम्ही बोला की तू काल आला आहेस. आम्ही पक्षातच राहणार आहे. तू जायचे तर जा, असे तुम्ही आम्हाला म्हणा आणि पक्षात राहून संघर्ष करा. Chandrakant Patil Gopinathgad | राष्ट्रवादीविरोधातील लढाई मुंडेंकडून शिकलो, पवारांबद्दल अनादर नाही, पण पक्षासाठी लढलो- चंद्रकांत पाटील | ABP Majha गोपीनाथ मुंडेंच्या प्रेरणेमुळेच आम्ही शरद पवारांना अंगावर घेऊ शकलो. पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकू शकलो. गेल्या पाच वर्षात गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेमुळे पश्चिम महाराष्ट्रात जागा वाढल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याशिवाय, गोपीनाथ मुंडे भरल्या ताटावरुन उठून गेल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, पण मुंडेंच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी कुटुंबाला समर्थपणे सावरले, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Embed widget