एक्स्प्लोर

सामनाच्या 'रोखठोक'साठी चंद्रकांत पाटलांनी सुचवले मुद्दे; छापून दाखवण्याचं संजय राऊत यांना आवाहन

महाविकास आघाडी सरकारमधला विसंवाद आणि वादावर बोट ठेवत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. तसेच सामनाच्या 'रोखठोक' सदरासाठी काही मुद्दे सुचवले आहेत.

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर सातत्याने टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून आव्हान दिलंय. महाविकास आघाडी सरकारमधला विसंवाद आणि वादावर बोट ठेवत पाटील यांनी राऊतांना टोला लगावला आहे. पोलीस आयुक्तांच्या बदल्यांवरून झालेलं नाराजीनाट्य, पारनेर नगरसेवकांची फोडाफोडी आणि घरवापसी, शेतकरी कर्जमाफी आणि बोगस बियाणांचा पुरवठा असे विषय चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या 'रोखठोक' सदरासाठी संजय राऊत यांना सुचवले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे संजय राऊतांना काय दिले आव्हान?

@rautsanjay61, सामना वृत्तपत्रातील या आठवड्यातील 'रोखठोक' साठी माझे प्रस्ताव...

नंबर 1 - "मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय १० आयपीएस अधिकाऱ्यांची बदली... ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे... तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द... मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं....हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे..."

नंबर 2 - "पारनेर नगरपरिषदेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला... सर्वांना आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा होतच असते... पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत... मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही... हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे..."

नंबर 3 - "ठाकरे सरकार तर सर्वोत्तम आहे... यापूर्वी राज्याला असे प्रशासन कधीही लाभले नाही.... मात्र कोरोनाचा मृत्युदर वाढत चालला आहे... दिवसाला ६ हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत... हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे..."

नंबर 4 - "राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्याचे ढोल बडवले... अजूनही अंमलबजावणी नाही... शेतकऱ्यांना वाईट दर्जाचे बियाणे दिले जात आहेत... खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यात आलं नाही... हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे..."

मागच्या 'रोखठोक' सदरात संजय राऊतांनी राज्यपाल नियुक्ती सदस्यांच्या नियुक्त्या लांबणीवर पडण्याच्या शक्यतेचा आधार घेत राज्यात राजकीय आणीबाणी सुरु असल्याची टीका केली. सदस्यांची मुदत संपूनही या नियुक्त्या न करण्यामागे केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या राज्यपालांचा उपयोग होत असल्याची शंका व्यक्त केली होती. इतकंच नाही तर भाजपकडून ठाकरे सरकार खाली खेचण्याचे स्वप्नरंजन यासाठी कारणीभूत असल्याची शक्यताही राऊत यांनी वर्तवली होती.

पाहा व्हिडीओ : ही खिचडी नाहीए, हे सरकार तीन पक्षांनी मिळून बनलंय आणि ते पाच वर्षे टिकेल - संजय राऊत

राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्रालय आणि भाजपवर सामनाने टीकेचे बाण सोडल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झालेत. राज्यात सुरु असलेल्या महाविकास आघाडीतील बेबनाव आणि कारभारावरून चिमटे काढत पाटील यांनी पुढच्या सदरात राज्यातील विषयाला हात घालण्याचा खोचक सल्ला राऊत यांना दिला आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमधला हा सामना आणखी किती रंगतो हे पाहून औत्सुक्याचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या :

'त्या' नगरसेवकांना अजित पवारांनी फोडलं असं म्हणता येणार नाही : संजय राऊत

शरद पवारांचे नेमके गौप्यस्फोट कोणते? संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीची उत्सुकता!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaDisha Salian Case : दिशा सालियन प्रकरण 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील ओझांना पेनड्राईव्ह दिलाMahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोपJob Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
धक्कादायक! भावी नवऱ्यालाच संपवण्याची सुपारी दिली; नवरी फरार, मारहाण करणाऱ्या 5 जणांना अटक
Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर? 
Kunal Kamra : 10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
10 वर्षांपासून जिथं राहत नाही तिथं, जाऊन येणं म्हणजे...कुणाल कामराची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन असलेल्या कळंबच्या महिलेची हत्या? धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget