मनोज जरांगेंना हात जोडून विनंती, मुंबईत येऊन प्रश्न सुटणार नाही, मुंबई विस्कळीत करु नका : चंद्रकांत पाटील
मुंबईत येऊन प्रश्न सुटणार नाही, हा प्रश्न चर्चेतून सुटेल असं आम्ही वारंवार त्यांना सांगत आहोत, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
Chandrakant Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरु मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत येऊन प्रश्न सुटणार नाही, हा प्रश्न चर्चेतून सुटेल असं आम्ही वारंवार त्यांना सांगत आहोत, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. व्यवहारात कोणती मागणी मान्य होऊ शकेल व कोणती आपण कितीही ठरवलं तरी मान्य होणार नाही. नाईलाजला काही इलाज नाही असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. दाखला हवा एवढेच समाधान हवं आहे का? अनेकांना याआधी सर्टिफिकेट दिले आहेतच असे पाटील म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या संपूर्ण विषयावर शिंदे समिती अजूनही काम करत आहे. मनोज जरांगे पाटील यांना हात जोडून विनंती आहे की मुंबई विस्कळीत करु नका, सामान्य मुंबईकरांचा काय दोष आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाचा मार्ग चर्चेतून सुटेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुंबईतील आझाद मैदानात आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे युवक या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली आहे. आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत.
आमच्या सरकारनं मराठा समाजाला न्याय दिला
गेल्या दहा वर्षात आमचं सरकार असतानाच मराठा समाजाला न्याय दिला, आरक्षण दिलं. त्या आधीच्या कोणत्याही सरकारने मराठा समाजासाठी काहीही केलं नाही असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लागावं अशी ठाकरे-पवारांची इच्छा असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणसाठी आंदोलन सुरू आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. काही पक्ष हे सोईची भूमिका घेत आहेत. ते ठाम भूमिका घेत नाहीत. तुमची कायदेशीर भूमिका काय आहे ते सांगा. ते समाजासमाजात भांडण लावत आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करत आहेत असं फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Maratha Reservation : मराठा समाजाबाबत आम्ही सकारात्मक, ठाकरे-पवारांनी मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावू नये; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
























