एक्स्प्लोर

समरजीत घाटगे कधी करणार भाजपमध्ये प्रवेश? मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सगळच सांगितलं

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पश्क्षाचे नेते समरजित घाटगे (Samarjit ghatge) हे पुन्हा एकदा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत.

Chandrakant Patil on Samarjit Ghatge :  कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पश्क्षाचे नेते समरजित घाटगे (Samarjit ghatge) हे पुन्हा एकदा भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. समरजीत घाटगे पुन्हा एकदा भाजपच्या ब्रॉड कोल्डमध्ये आलेले आहेत. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

गेल्या अनेक दिवसापासून समरजीत घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला रामाराम करुन भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. कारण त्यांच्या प्रवेशाबाबत महत्वाची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. समरजीत घाटगे पुन्हा एकदा भाजपच्या ब्रॉड कोल्डमध्ये आलेले आहेत. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले. समरजीत घाटगे यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कमळ चिन्हावर लढवणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. समरजीत घाटगे महायुतीच्या बैठकीला देखील उपस्थित होते.  

विधानसभा निवडणुकीवेळी केला होता शरद पवार गटात प्रवेश

विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी थेट निवडणूक लढवली, मात्र या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर घाटगे यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अनेक ठिकाणी अनपेक्षित राजकीय युत्या पाहायला मिळाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्येही नगरपरिषद निवडणुकीदरम्यान अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. कागल नगरपालिका निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजिसिंह घाटगे यांच्या आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. कागल नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचा दारुण पराभव करत या आघाडीने 23 पैकी 23 जागा जिंकत पूर्ण ‘व्हाईट वॉश’ केला. याचबरोबर नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने यांचा विजय झाल्याने कागलमधील दोन्ही नेत्यांच्या आघाडीवर मतदारांनी स्पष्टपणे विश्वास दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Samarjit Ghatge Kolhapur: मोठी बातमी : समरजित घाटगेंची घरवापसी, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Embed widget