एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूरकरांनो, खंडपीठासाठी आंदोलन करु नका : चंद्रकांत पाटील
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे व्हावं, हा निर्णय मुंबई उच्च न्यायालय घेईल. त्यामुळे कोल्हापूर आणि पुण्यातील नागरिकांनी आंदोलन करु नये, असं आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला व्हावं की पुण्याला व्हावं किंवा दोन्ही ठिकाणी असावं याबद्दलचा निर्णय मुंबई उच्च न्यायालायच्या मुख्य न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी घ्यायचा आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी आणि पुणेकरांनी आंदोलन करु नये, असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
सरकारचं काम सोयीसुविधा पुरवण्याचं : चंद्रकांत पाटील
सरकारचं काम हे पायाभूत सोयीसुविधा पुरवण्याचे असून, खंडपीठाबद्दलचा निर्णय न्यायालय घेईल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन
गेल्या काही काळापासून कोल्हापूर आणि पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आंदोलन केलं जात आहे. कोल्हापुरात अनेकदा या आंदोलनानं आक्रमक पवित्राही घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकर आणि पुणेकरांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement