एक्स्प्लोर
उल्हासनगरमधील वडापाव विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू
उल्हासनगर : उल्हासनगरमधील वडापाव विक्रेते चंदरलाल रामरखियानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारी त्यांना किरकोळ कारणावरुन एका व्यक्तीकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात ते 100 टक्के भाजले होते.
ऐरोलीच्या नॅशनल बर्न रुग्णालयात रामरखियानी यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी 8.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आरोपी सुरेश आहुजा अजूनही फरारच आहे. विठ्ठलवाडी पोलीस आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करणार आहेत.
व्यावसायिक वादातून एका वडापाव विक्रेत्याने दुसऱ्या वडापाव विक्रेत्याला पेटवून दिलं. यामध्ये दुकान मालक चंदरलाल रामरखियानी 100 टक्के भाजले. घटनेनंतर त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रामरखियानी यांचं उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ जम्बो वडापावचं दुकान आहे. मात्र त्यांच्या दुकानाबाहेर सुरेश नामक फेरीवाला वडापावचा व्यवसाय सुरु करणार होता. यावरुन चंदरलाल आणि सुरेश यांच्यात वाद झाला. त्यानंतर सुरेश यांनी रामरखियानी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिंवत जाळण्याचा प्रयत्न केला.
संबंधित बातमी : वडापाव विक्रेत्याने वडापाव विक्रेत्यालाच जिवंत जाळलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement