एक्स्प्लोर
केंद्राकडून दिवाळी गिफ्ट, 70 रुपये किलोने डाळ मिळणार!

मुंबईः दिवाळीनिमित्त ग्राहकांना सरकार हरभरा डाळ 70 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करून देणार आहे. यासाठी केंद्राकडून राज्याला 700 मेट्रिक टन डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महिन्याभरापासून हरभरा डाळीचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे दिवाळीनिमित्त ग्राहकांना अल्प दरात डाळ उपलब्ध करून देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे.
राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशा शहरात खुल्या बाजारात ही डाळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या संदर्भात आज आदेश निघण्याची शक्यता आहे.
दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र सरकारी डाळ बाजारात येण्यासाठी अजून 2-3 दिवस लागण्याची शक्यता आहे.
संबंधित बातमीः ऐन दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीचे दर दुप्पट
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement
























