एक्स्प्लोर

राज्यातील कोरोना परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

कराड : राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. तर, याला उत्तर म्हणून महाविकास आघाडीतीन महत्वाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत फडणवीसांचे दावे खोडून काढले. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. वाढत्या रुग्णांबाबत मोठी चूक ही केंद्र सरकारची असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आरोग्य संघटनेने महामारी घोषीत केल्यानंतर सरकारने त्याला गांभीर्याने घेतलं नसल्याचं चव्हाण म्हणाले.

दुर्दैवाने मुंबई विमानतळ सुरू ठेवलं. दररोज 16 हजार प्रवासी येत होते. त्या चौदा दिवसात किती प्रवासी आले असतील? जे प्रवासी आले त्यांना क्वॉरंटाईन केलं नाही. त्यांना होम क्वॉरंटाईन केलं. मात्र त्यांनी तो आजार पसरवला. म्हणून याची जबाबदारी केंद्र सरकारने स्विकारली पाहिजेत. धारावीत सोशल डिस्टंन्सिंग ठेवता येत नाही. लोकसंख्या जास्त आणि त्यात केंद्र सरकार टेस्टिंग किटसाठी आणि इतर मदत करायला तयार नाही. टेस्टिंग जास्त केल्यामुळे रुग्णांची संख्या जास्त सापडतेय. महाराष्ट्र सरकार चांगल्या प्रकारे या परिस्थितीला सामोरे जात आहे. केंद्र सरकारने काही सूचना असतील तर त्या कराव्यात. राज्य सरकार सर्व सुचनांचं पालन करतंय. रेल्वेने किंवा विमानाने प्रसासी पाठवायचे तर त्यात आम्ही काहीच करु शकत नाही.

पियुष गोयल यांच्या ट्विटला उत्तर

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी किती ट्रेन पाठवल्या हे सांगण्यापेक्षा सर्व रेल्वे खुल्या कराव्यात. कोरोनाच्या आधी जेवढ्या ट्रेन जात होत्या, तेवढ्या सोडाव्यात. भरतील नाहीतर नाय भरतील. एकमेकांवर आरोप करणे हे केंद्रीय मंत्र्याला शोभत नाही. त्यामुळे असं राजकारण होतं. याचा अर्थ पंतप्रधानांना आपल्या मंत्र्यांवर अंकुश ठेवता येत नाही का? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.

राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी भाजपच्या कारवाया चालल्या होत्या. मध्यप्रदेश मध्ये घडलं, कर्नाटकमध्ये घडलं तेच महाराष्ट्रात करायचा प्लॅन आहे. आमदारांची फोडाफोड करुन राज्यात सत्तांतर होणार नाही. फोडाफोडीने काही होणार नाही. म्हणून इतर प्लॅन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकांना ते आवडणार नाही, हे लक्षात आल्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे स्टेटमेंट आले की आम्ही तसे काही करणार नाही. नारायण राणे जे काही बोलले ते व्यक्तीगत बोलले त्याला अधिकृत मान्यता नव्हती. होती की नव्हती हे त्यांचं त्यांनाच माहिती, असंही चव्हण म्हणाले.

राज्य सरकार प्रत्येकवेळी एक आभासी आकडा फेकतात; देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

काँग्रेसचा उल्लेख होताना पहायला मिळत नाही आपण कौतुकासाठी काही करत नाही. आपल्याला राज्य वाचवायचयं, देश वाचवायचाय, कोरोनाशी लढण्याची जी तीन महत्वाची खाती आहेत. आरोग्य मंत्री, गृहमंत्री आणि तिसरं मुख्यमंत्री या तीघांवर फोकस असणारचं. हा आरोपचं मुळात चुकिचा आहे. तिन्ही पक्ष एका विचाराने काम करतोय. आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय निरुपम, प्रफुल्ल पटेल जे बोलेल ते त्यांचं व्यक्तीगत मत असल्याचं चव्हाण यांनी सांगितले.

राहुल गांधी यांचं वक्तव्य राहुल गांधी यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. ही चर्चा भाजपकडून मुद्दामहून घडत आहे. तर, शरद पवार यांची राज्यपालांशी झालेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Prithviraj Chavan | राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर पृथ्वीराज चव्हाण यांना काय वाटतं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Embed widget