बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची (Baba Siddiqui Murder Case) जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली आहे.
Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची (Baba Siddiqui Murder Case) जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली आहे. फेकबुक पोस्ट करणारा शुभू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर (Shubham Lonkar) आहे का? याचा तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभू लोणकर ज्यांचे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते, असा संशय मुंबई पोलिसांना आहे.
शुभम लोणकरच्या घराला कुलूप, पुण्यात असल्याचा संशय
शुभम लोणकर हा मूळ अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी बुजरुक गावाचा रहिवासी आहे. दरम्यान, आता अकोला पोलिसांनी देखील लोणकर कनेक्शनचा तपास सुरू केला आहे. अकोला पोलीस दलातील आयपीएस अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील नेव्होरी बुजरुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र, शुभम लोणकर याच्या घराला कुलूप लावलेल दिसून आलं आहे. त्याच्या घरी कोणीही नसल्याचं पोलिसांना दिसून आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गावात नाही. तो पुण्यात असल्याचा संशय आहे.
शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा असल्याची चर्चा
विशेष म्हणजे या आधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीन पिस्टल आणि 11 जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा असल्याच म्हटलं जातंय. 4 फेब्रुवारी 2024 रोजी अकोला पोलिसांनी शुभमला पुण्यातील वारजे भागातल्या भालेकर वस्तीतून अटक केली होतेय. बेकायदा शस्त्रविक्रीप्रकरणी अकोला पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती, अशी माहिती अकोल्याचे सहायक पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांनी दिली.
आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीत पोस्टमध्ये केला आहे.
महत्वाच्या बातम्या: