CBSE Exam Result: सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रात निकालाचा टक्का वाढला, मार्कशीट कुठे पहाल?
CBSC 12th Result: महाराष्ट्र विभागाचा CBSC बोर्डाचा 12 वीचा निकाल यंदा विशेष ठरला असून येथे 90.93% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात मुलींचा निकाल मुलांपेक्षा पुन्हा एकदा सरस ठरला आहे.

CBSC 12th Result: दहावीच्या परीक्षेचा निकालासह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSC) बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय. यंदा एकूण 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात 0.41 टक्क्यांची वाढ झाली आहे. (Maharashtra CBSC 12th Result)
महाराष्ट्र विभागाचा निकाल यंदा विशेष ठरला असून येथे 90.93% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात मुलींचा निकाल मुलांपेक्षा पुन्हा एकदा सरस ठरला आहे. महाराष्ट्रात 92.75% मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचा निकाल 88.89% आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) अधिकृत वेबसाइटवर निकाल अपलोड केला आहे. विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि शाळा क्रमांक वापरून निकाल पाहता येणार आहे. सीबीएसई 12 च्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी आता त्यांचा सीबीएसई बोर्डाचा निकाल ऑनलाइन पाहू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स जसे की रोल नंबर, प्रवेशपत्र आयडी इत्यादी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
कुठे चेक कराल निकाल?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई इयत्ता 12 वीचा निकाल 2025 ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरून निकाल डाउनलोड करण्यासाठी त्यांच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करावा लागेल. विद्यार्थी त्यांचे निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक तपासू शकतात.अधिकृत वेबसाइटवर तुमचे निकाल तपासा.https://cbseresults.nic.in/
जर कोणताही विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिकेवर समाधानी नसेल, तर त्यांना उत्तरपत्रिकेच्या पुर्नमुल्यांकनासाठी अर्ज करण्याची परवानगी आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेच्या रिचेकींगला आवश्यक असलेली फी भरावी लागेल. अंतिम मुदतीनंतर, बोर्ड प्राधिकरणाकडून गुणपत्रिकेत कोणताही बदल केला जाणार नाही. सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन ग्रेडिंग पद्धतीनुसार करते.खाली दिलेल्या तक्त्यात सीबीएसईच्या ग्रेडिंग सिस्टीमनुसार गुण, त्यांची संबंधित ग्रेड आणि ग्रेड पॉइंट्स दिले आहेत:
| गुणांची श्रेणी | ग्रेड | ग्रेड पॉइंट्स |
|---|---|---|
| 91 - 100 | A1 | 10 |
| 81 - 90 | A2 | 9 |
| 71 - 80 | B1 | 8 |
| 61 - 70 | B2 | 7 |
| 51 - 60 | C1 | 6 |
| 41 - 50 | C2 | 5 |
| 31 - 40 | D | 4 |
महाराष्ट्र CBSC बोर्डाचा 12 वीचा निकाल काय?
- सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 88.39 टक्के
- मागील वर्षीच्या तुलनेत 0.41 टक्क्यांनी निकालात वाढ
- सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षेचा महाराष्ट्र विभागाचा निकाल 90.93%
- महाराष्ट्र मध्ये 88.89% मुले उत्तीर्ण तर मुलींचा निकाल 92.75%
महाराष्ट्र SSC बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर
महाराष्ट्राचा 10 वीचा निकाल 94.10 % टक्के लागला आहे. यात पुणे विभागाचा निकाल 94.81 टक्के निकाल लागला आहे. या वर्षी देखील कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. यंदाही राज्यात मुलींची बाजी मारली आहे.
हेही वाचा:























