एक्स्प्लोर
सतीश शेट्टी हत्या: माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकरांना अटक
पुणे : तळेगाव-दाभाडे इथले आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांना अटक केली आहे.
सतीश शेट्टी यांनी माहिती अधिकार कायद्याच्या मध्यमातून मावळ तालुक्यातील अनेक गैरव्यवहार उघडकीस आणले होते. 2009-2010 मध्ये पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील काही जमिनी आयआरबीने बळकावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर 13 जानेवारी 2010 रोजी भंडारी हॉस्पिटल समोर सतीश शेट्टी यांची अज्ञातांनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता.
भाऊसाहेब आंधळकर हे या प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी होते. त्यांनीच गुंड श्याम दाभाडे याच्यासह पाच जणांना सतीश शेट्टी यांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. मात्र आंधळकर आणि त्यांचे सहकारी तपासामध्ये दिशाभूल करत असून ते खऱ्या आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप सतीश शेट्टी यांचा भाऊ संदीप शेट्टी यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास जुलै 2010मध्ये स्थानिक पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. इतकंच नाही तर तत्कालीन तपास अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह आयआरबीच्या संचालकांविरोधात संशयित म्हणून एफआयआर देखील दाखल करण्यात आली होती. त्यांची चौकशी होऊन पोलीग्राफ टेस्ट ही घेण्यात आली होती.
दरम्यान, भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलिस सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement