CGST Mumbai : सीबीआयने मुंबईत लाचखोर सेंट्रल जीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; 60 लाखांची लाच मागितली, 30 लाख हवालाकडून घेतले
यामध्ये सीजीएसटीचे अतिरिक्त सह आयुक्त, सीजीएसटी आयुक्त, 4 अधीक्षक, 2 सनदी लेखापालासह एका खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत सीजीएसटी लाचखोर अधीक्षकासह दोघांच्या सीबीआयकडून लाच घेतल्या प्रकरणात मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी लाच मिळवण्यासाठी टोळीच केल्याचे दिसून येत आहे. सीबीआयकडून एका खासगी व्यक्तीसह तब्बल सात अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना सीबीआयने न्यायालयात हजर केले असता सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
CBI arrested 3 accused including a superintendent of CGST (anti-evasion), Mumbai and two private persons during a trap for accepting Rs 20 lakh as part bribe amount out of the demanded undue advantage of Rs 60 lakh; Rs 30 lakh of bribe amount allegedly delivered through Hawala:… pic.twitter.com/iLrlyAg7Ha
— ANI (@ANI) September 8, 2024
60 लाखांची लाच मागितली, सहा आरोपी सीजीएसटीचे वरिष्ठ अधिकारी
सीजीएसटीकडील प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे सीजीएसटी अधिकाऱ्यांनी 60 लाखांची मागणी केली होती. यामधील 30 लाख रुपये तक्रारदाराकडून हवालामार्फत देण्यात आल्याचे तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी सीबीआयने ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील सहा आरोपी हे सीजीएसटीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. यामध्ये सीजीएसटीचे अतिरिक्त सह आयुक्त, सीजीएसटी आयुक्त, 4 अधीक्षक, 2 सनदी लेखापालासह एका खासगी व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. या लाच प्रकरणी सीबीआयने 9 ठिकाणी छापेमारी करत आरोपींविरोधात महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
सहा अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
1. दीपक कुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त, सीजीएसटी आयुक्तालय, मुंबई पश्चिम
2. सचिन गोकुळका, अधीक्षक CGST आयुक्तालय, मुंबई पश्चिम
3. बिजेंदर जानवा, अधीक्षक CGST आयुक्तालय, मुंबई पश्चिम
4. निखिल अग्रवाल, अधीक्षक CGST आयुक्तालय, मुंबई पश्चिम
5. नितीनकुमार गुप्ता, अधीक्षक CGST आयुक्तालय, मुंबई पश्चिम
6. राहुल कुमार, सह आयुक्त सीजीएसटी
7. राज अग्रवाल, चार्टर्ड अकाउंटंट
8. अभिषेक मेहता (खाजगी व्यक्ती)
इतर महत्वाच्या बातम्या