एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझा इम्पॅक्ट : पोलिसांना निकृष्ट जेवण देणाऱ्या केटररची हकालपट्टी
एबीपी माझाने याबाबतचं वृत्त देताच नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी वृत्ताची गंभीर देखल घेत कारवाई केली.
नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिसांनी निकृष्ट जेवण देणाऱ्या केटररची हकालपट्टी करण्यात आली आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त देताच नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी वृत्ताची गंभीर देखल घेत कारवाई केली.
नागपुरात बंदोबस्तात तैनात 5 हजार पोलिसांना जेवण देण्यासाठी एकूण 5 केटरर नेमण्यात आले आहेत. त्यापैकी श्रीकृष्ण केटररला आजच्या प्रकारासाठी जबाबदार मानत कामावरुन दूर करण्यात आलं.
काय आहे प्रकरण?
नेते तुपाशी, पोलीस उपाशी अशीच परिस्थिती नागपुरात पाहायला मिळाली. राज्याच्या हिवाळी अधिवेशन काळात कायदा- सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अर्धवट आणि निकृष्ट जेवण देण्यात आलं.
पोलिसांच्या ताटात 9 पदार्थांचे आश्वासन असताना फक्त 2 पदार्थच पोलिसांना देण्यात आले. हे दोन पदार्थ म्हणजे फक्त वरण आणि भातावर बोळवण करण्यात आली. चपाती, 2 भाज्या, सलाड, मिठाई, लोणचे, पापड यापैकी एकही पदार्थ पोलिसांना मिळाला नाही.
इतकंच नाही तर, उभं राहून, नेहमीच सतर्क असणाऱ्या पोलिसांना सकाळचे जेवण दुपारनंतर म्हणजेच साडे तीन वाजता देण्यात आले.
यावरुनच सरकार तुपाशी आणि सरकारच्या सुरक्षेसाठी तैनात हजारो पोलीस उपाशी, असं चित्र नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळालं.
जर पोलीस सशक्त असेल, तर समाज सशक्त, सुरक्षित राहील. मात्र पोलिसांनाच जर दुपारी तीन-साडेतीन वाजता जेवण मिळणार असेल, तर पोलीस आपली शारीरिक क्षमता कशी टिकवून ठेवणार आणि समाजाचं रक्षण कसं करणार हा प्रश्न आहे.
संबंधित बातमी : नेते तुपाशी, पोलीस उपाशी, डाळ-भात खाऊन पोलिसांची अधिवेशनाला सुरक्षा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement