एक्स्प्लोर

Jitendra Awhad : शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

Jitendra Awhad : खोटी माहिती प्रसारित करुन शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी (3 सप्टेंबर) रोजी एक परिपत्रक काढल्याचं समोर आलेलं होतं. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केल्याचं ते परिपत्रक असल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर टीका केली आणि शेतकरी कुटुंबासाठी पैसे नाहीत का? असा सवाल  उपस्थित केला होता. या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संभाजीनगर वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्याविरोधात गुन्हा दाखल

खोटी माहिती प्रसारित करुन शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगर वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय न्याय संहिता 353(2) अंतर्गत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकीची माहिती प्रसारित करून सरकारची बदनामी केल्याप्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (गुरूवारी) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता.

काय आहे नेमकं प्रकरण? 

राज्याच्या महसूल व वन विभागाने मंगळवारी एक परिपत्रक काढलं होतं, यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केल्याचं म्हटलं होतं. राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठीच्या तातडीच्या निधीची मान्यता बंद करण्यात आल्याची माहिती विभागानेकडून देण्यात आलेली होती. मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काल(गुरूवारी) पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीचा निधी बंद करण्यात आलेल्या आदेशाबाबत चर्चा झाली. या बैठकीत लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचे मंत्रिमंडळाने स्पष्ट केलं आहे. तसेच
शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सरकारने म्हटलं आहे.

याबाबत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शासनाच्या एका जीआरचा चुकीचा संदर्भ देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाने आता मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता. त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हा जीआर आणि एक पोस्ट शेअक करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. यामध्ये त्यांनी "आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद, महसूल व वन विभागाने काढले परिपत्रक'लाडकी बहीण' चा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना?, शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे 'लाडकी बहीण' योजनेला", अशी पोस्ट शेअर केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget