एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
यवतमाळमध्ये कार नदीत कोसळून तिघांचा जागीच मृत्यू
मार्लेगावजवळ कठडे नसलेल्या पुलावरुन कार पैनगंगा नदीच्या पात्रात कोसळली. ट्रकची कारला धडक लागल्याने अपघात झाला आहे.
![यवतमाळमध्ये कार नदीत कोसळून तिघांचा जागीच मृत्यू Car Accident In Yavatmal 3 Died Latest Marathi News Updates यवतमाळमध्ये कार नदीत कोसळून तिघांचा जागीच मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/25141743/yawatmal-car-accident.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
यवतमाळ : यवतमाळमधील उमरखेड-हदगाव मार्गावरील कार पैनगंगा नदीत कोसळून तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका ट्रकची कारला धडक बसल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मार्लेगावजवळ कठडे नसलेल्या पुलावरुन कार पैनगंगा नदीच्या पात्रात कोसळली. ट्रकची कारला धडक लागल्याने अपघात झाला आहे. उमरखेड जवळून ही नदी वाहते आणि या नदीच्या पुलावर कठडे नाहीत तिथूनच ही कार नदीमध्ये कोसळली. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
परभणी येथील वजन मापे विभागातील निरीक्षक ज्ञानेश्वर गोटे, त्यांची पत्नी रत्ना गोटे व चालक अशा तिघांचा या अपघातात मृत्यू झाला असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)