एक्स्प्लोर
उंटाला त्रास देणं जीवावर, उंटाने गळा धरल्याने युवकाचा मृत्यू
15 वर्षांच्या समीर इनामदारने संदलमधील उंटाची दोरी ओढली. अनेक वेळा दोरी खेचल्याने उंट बिथरला आणि त्याने थेट समीरचा गळा धरला.

परभणी : मुक्या प्राण्याला त्रास देणं परभणीतील युवकाच्या जीवावर बेतलं आहे. दोरी ओढून त्रास दिल्यामुळे खवळलेल्या उंटाने युवकाचा गळा धरला. यामध्ये 15 वर्षांच्या तरुणाला प्राण गमवावे लागले.
परभणीच्या सय्यद शाह तुराबुल हक रहे दर्ग्याची उर्स यात्रा सुरु आहे. उर्स यात्रेदरम्यान विविध भक्त दर्ग्यापर्यंत संदल काढतात. या संदलमध्ये उंट, घोड्यांचाही सहभाग असतो.
दर्ग्याचे भक्त शेख समद शेख गफूर यांनी संदल आयोजित केला होता. हा संदल शहरातील जनता मार्केटजवळ आला असताना 15 वर्षांच्या समीर इनामदारने संदलमधील उंटाची दोरी ओढली. अनेक वेळा दोरी खेचल्याने उंट बिथरला आणि त्याने थेट समीरचा गळा धरला.
संदल मिरवणुकीत सहभागी असलेल्या इतर भाविकांनी उंटाच्या तावडीतून समीरची सुटका केली. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांनी जबाब दिला असून त्यानुसार नानल पेठ पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय उंट आणि उंट मालक विलास खरात यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
