सनी लियोनीच्या गाडीचा नंबर वापरल्याप्रकरणी व्यावसायिक अटकेत
पती डॅनिअल वेबर यांच्या मॅनेजरने या विषयी जुहू पोलिस स्थानक आणि वरळी वाहतूक विभागात तक्रार केली होती. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई पोलिसांनी कल्याण येथील एका व्यावयायिकावर अभिनेत्री सनी लियोनीच्या गाडीचा क्रमांक वापरल्याबद्दल अटक केली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ई-चलन आले होते. परंतु त्या पत्त्यावर सनी त्या वेळी उपस्थित नव्हती, ही बाब लक्षात आल्यानंतर पती डॅनिअल वेबर यांच्या मॅनेजरने या विषयी जुहू पोलिस स्थानक आणि वरळी वाहतूक विभागात तक्रार केली होती.
डीएन नगर वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 2 वाजता सनी लियोनीचा गाडी ड्रायव्हर अकबर खानने त्यांच्या गाडीप्रमाणे दिसणारी एक गाडी वर्सोवा परिसरातील एका हॉस्पिटल जवळ पाहिली. ज्या गाडीवर सेम क्रमांक होता. त्यानंतर डीएन नगर वाहतूक विभागातील कॉन्सटेबल या ठिकाणी गेले. ततर दोन्ही गाडीवर सेम क्रमांक असल्याचे आढळले.
मुंबई वाहतूक विभागाचे डिसीपी सोमनाथ घारगे यांनी सांगितले की, आमच्या कॉन्सटेबलने त्या गाडीमध्ये बसलेल्या पियूष सेन यांना डीएन नगर वाहतूक विभागात आणले. त्यांना गाडीचे कागदपत्र दाखवण्यास सांगितले. परंतु त्यांच्याकडे गाडीचे पेपर नव्हते. चौकशीनंतर पियूष सेन यांनी कबुली दिली की, गाडीवरील जो क्रमांक ते वापरत आहे, तो त्यांच्या गाडीचा क्रमांक नाही.दरम्यान पोलिसांनी सनीचे पती डॅनिअल यांना देखील गाडीचे कागपत्र दाखविण्यास सांगितले, ज्यानंतर ही गाडी डॅनिअल यांची असल्याचे कागदपत्रावरुन लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी सेन यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.