एक्स्प्लोर
लातूर-धवेली बस सेवा अखेर सुरु, विद्यार्थ्यांनी मानले ‘एबीपी माझा’चे आभार

लातूर : लातूरमधील धवेली, आनंदवाडी आणि कवठाळी गावात खराब रस्त्यामुळे बस येत नव्हती. त्यामुळे जाणवळला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा सुटली होती. ‘एबीपी माझा’नं ही बातमी दाखवल्यानंतर आजपासून रोज शाळेच्या वेळेनुसार बस सोडण्यात येत आहे. गावातला रस्ता खराब असल्याची तक्रार गावकऱ्यांनी वेळोवेळी केली. विद्यार्थ्यांनी तर चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शाळा सूटत असल्याची कैफियत मांडली होती. एबीपी माझानं विद्यार्थ्यांची ही समस्या जगासमोर मांडली आणि अवघ्या दोनच दिवसात प्रशासनाला बस सुरू करण्यास भाग पाडलं. बस सुरू झाल्यानं विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी एबीपी माझाचे आभार मानले.
संबंधित बातमी : रस्ता नसल्याने शाळा बंद, विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची फणी पूर्ण केली असून, आजपासून त्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या काम सुरू होईल. निधी आल्यानंतर रस्त्याचं पक्कं काम केलं जाईल, अशी माहिती चाकूरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत झांपले यांनी दिली. दोन दिवसात प्रशासन गतीने कामाला लागले. मागील अनेक वर्षांपासून पाठपुरवा केल्यानंतरही दाद मिळाली नाही, ते काम ‘एबीपी माझा’ने केल्याचे सांगत, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आभार मानले.आणखी वाचा






















