एक्स्प्लोर
बारी घाटात बसचालकाच्या प्रसंगावधानाने 60 प्रवाशांचे प्राण बचावले
शिर्डी : शिर्डीच्या अकोला तालुक्यात महामंडळाच्या बसचा मोठा अपघात होता होता वाचला आहे. बस दरीत कोसळण्यापासून ड्रायव्हरने यशस्वीपणे रोखल्याने 60 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
बारी घाटाजवळून बस जात असताना चालकाला बसचे ब्रेक फेल असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्याने बसचे पुढचे टायर फुटून पाठीमागे गेले. त्यामुळे ही बस दरीत कोसळण्याचा धोका होता.
यावेळी चालकाने प्रसंगावधान दाखवून बस एका खडकावर ठोकली. ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातादरम्यान बसमध्ये 60 प्रवासी होते, यातील 4-5 जणांना किरकोळ जखमा झाल्यात. सध्या जखमींवर घोटीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement