एक्स्प्लोर

मेणबत्ती उद्योगाच्या नावाखाली 'बंटी-बबली' स्टाईल 400 महिलांची फसवणूक

औरंगाबाद : औरंगाबादेत एका बंटी आणि बबलीने मेणबत्ती तयार करण्याच्या गृहउद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालं आहे. गृहउद्योगाच्या नावाने या बंटी बंबलीने 400 महिलांची फसवणूक केली आहे. सगळे पैसै घेऊन आता हे पसारही झाले आहेत. 'बंटी बबली' या सिनेमाप्रमाणेच औरंगाबादमध्ये एका दाम्पत्याने जवळपास 400 महिला पुरुषांना गंडा घालत पोबारा केला आहे. मूळचे नागपूरचे असणारे प्रशिक बनसोड आणि नेहा बनसोड या दाम्पत्याने औरंगाबादेत ग्लोबल गृहउद्योगाच्या नावाखाली कंपनी सुरु केली. त्याची जाहिरात अल्प भांडवलात मेणबत्ती तयार करण्याचा गृहउद्योग सुरु करा, मेणबत्ती तयार करण्यासाठीचा कच्चा माल कंपनी पुरवणार आणि मेणबत्तीही विकत घेणार, प्रतिमेणबत्ती 5 रुपये देणार असे लोकांना सांगण्यात आले. फक्त कच्च्या मालासाठी डिपॉझिट करायचे आणि कमाई सुरु, असे आमिष दाखवल्यानं अनेकांनी कच्च्या मालाचे पैसै या दाम्पत्याला दिले आणि मेणबत्ती बनवणे सुरुही झाले. जवळपास 400 महिला या उद्योगात या बंटी-बबलीनं जोडल्या सुरुवातीला पैसै दिले. मात्र, 10 दिवसांपूर्वी अचानक हे दाम्पत्य गायब झाले आणि पैसै गुंतवणूकदार घाबरले, कुठलाही ठावठिकाणा न लागल्याने अखेर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली. हे प्रकरण प्रथमदर्शनी मोठ्या फसवणुकीचं असल्याने औरंगाबाद पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवलं आहे. आतापर्यंतच्या तपासात 1 कोटींची फसवणूक समोर आली आहे. पोलिसांनी या कंपनीचे भाड्याचे असलेले कार्यालय सील केले आहे, तर कार्यालयातील सर्व सामान जप्त करण्यात आले आहे. याआधी बनसोड दाम्पत्याने नागपूरमध्ये सुद्धा लोकांची अशाच पद्धतीनं फसवणूक केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी तातडीनं बनसोड दाम्पत्याची बँक खातीही सिल केली आहेत. त्यातही 10 लाख रुपये असल्याची माहिती मिळते आहे. आता हे प्रकरण समोर आल्यानं पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी ओघ वाढत चालला आहे. त्यामुळे या बंटी बबलीनं हजारावर लोकांना फसवलं असू शकतं असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Embed widget