एक्स्प्लोर
सिंधुदुर्गात बैलाची दुहेरी झुंज, विहिरीत पडलेल्या बैलाला अखेर वाचवलं
बैलांची झुंज लावणं कोकणातील एका व्यक्तीला चांगलंच महाग पडलं. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ल्यात झुंज खेळता-खेळता बैल विहिरीत पडला आणि त्यानं मृत्यूशी पुन्हा झुंज दिली.

सिंधुदुर्ग : बैलांची झुंज लावणं कोकणातील एका व्यक्तीला चांगलंच महाग पडलं. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ल्यात झुंज खेळता-खेळता बैल विहिरीत पडला आणि त्यानं मृत्यूशी पुन्हा झुंज दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रेडीमध्ये बैलाची झुंज खेळवली जात होती. मात्र त्याचवेळी रेडीतील बोंडोजीवाडी विठ्ठल मंदिराजवळील विहिरीत हा बैल पडला आणि एकच गोंधळ उडाला. विहिरही अरुंद असल्यानं बैलाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ ग्रामस्थांना करावी लागली. दरम्यान रेडीच्या विहिरीत पडलेला बैल हा बापू बागायतकर यांचा आहे. ग्रामस्थांनी अथक परिश्रमानंतर बैलाला विहिरीतून बाहेर काढले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















