एक्स्प्लोर
Advertisement
पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणारा बँक अधिकारी अटकेत
शाखाधिकारी राजेश हिवसेला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांनी नागपुरातून अटक केली. दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अधिकारी राजेश हिवसे त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
बुलडाणा : पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. शाखाधिकारी राजेश हिवसेला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांनी नागपुरातून अटक केली.
दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अधिकारी राजेश हिवसे त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली होती. अखेर मलकापूर पोलिसांनी नागपुरातून या अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला उद्या मलकापूर न्यायालयात हजर करण्यात येईल.
काय आहे प्रकरण?
पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला. महिलेच्या तक्रारीवरुन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर आणि शिपायाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. तिथं बँक मॅनेजरने कागदपत्रांची चाळणी करुन तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली. त्यावर संबंधित शेतकऱ्यानं त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. नंतर मॅनेजरने शेतकरी पत्नीसोबत अश्लील संभाषण करत त्यांना शरीरसुखाची मागणी केली.
मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळं पॅकेजही देण्यात येईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठवला. याप्रकरणी मॅनेजर आणि शिपाई या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. शिपायाला अगोदरच अटक करण्यात आली होती, तर बँक मॅनेजरला आज अटक करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
नागपूर
Advertisement