एक्स्प्लोर
Advertisement
'गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है' म्हणत विरोधकांचा राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार
विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. त्यापूर्वी राज्यपालांचे विधानभवनात आगमन होताच विरोधकांनी ‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है’, अशी घोषणाबाजी केली.
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. राज्यपालांचं अभिभाषण हे फक्त कागदावरचं भाषण आहे. त्यातली एकही गोष्ट प्रत्यक्षात आलेली नाही, असा आरोप यावेळी विरोधकांनी केला. 2014 पासून सेना-भाजप सरकार सत्तेत आल्यापासून यावेळी पहिल्यांदाच राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्यात आला.
सरकार व राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है... आरएसएसचं समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो... अशा घोषणा देत काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनासमोर निदर्शने केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, दुष्काळ, आदी मुद्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मध्यवर्ती सभागृहातील अभिभाषण झाले. मात्र विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. त्यापूर्वी राज्यपालांचे विधानभवनात आगमन होताच विरोधकांनी ‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है’, अशी घोषणाबाजी केली.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला आहे. राज्यपाल हे पद घटनात्मक असताना, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे अशी भूमिका घेतली असल्याने त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे याबाबत शंका असल्याने आम्ही अभिभाषणावर बहिष्कार घातला असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.
राज्यपाल हे सरकारच्या वतीने ‘माझे सरकार हे करणार आहे,’ असे अभिभाषणात सांगतात. परंतु यांच्या सरकारने आजवरच्या अधिवेशनात सांगितलेली एकही गोष्ट केलेली नाही, उलट असहिष्णुतेचे वातावरण पसरवले, असा आरोप या वेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement