एक्स्प्लोर
अनैतिक संबंध लपवण्यासाठी सख्ख्या भावाची हत्या
आपल्या प्रेमसंबंधात भावाचा अडथळा होऊ नये व इतरांना याचा सुगावा लागू नये म्हणून सारिका आणि तिचा प्रियकर सुधाकरने रमेशच्या हत्येचा कट रचला.
सांगली : तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावात अनैतिक संबंध लपवण्यासाठी प्रियकराच्या मदतीने सख्ख्या बहिणीनेच आपल्या भावाची हत्या केल्याची घटना घडली आहे. रमेश बाळासो झांबरे (वय 30 वर्षे) याचा तरुणाचा मृतदेह 10 दिवसांपूर्वी डोंगरसोनी-वाघोली रस्त्यावर सापडला होता. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली होती.
या हत्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी डोंगरसोनी गावात राहणाऱ्या सुधाकर झांबरे (वय 38 वर्षे) आणि वडगावात राहणाऱ्या सारिका पाटील (वय 32 वर्षे) या प्रेमी युगुलास अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयित आरोपी सारिका पाटील आणि सुधाकर झांबरे यांच्यात अनेक दिवसापासून अनैतिक संबंध होते. दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण सारिकाचा भाऊ रमेश झांबरेला लागली होती. या कारणावरुन दोघांत वादावादी झाली होती. याबाबत रमेशने सारिकाला समजही दिली होती.
आपल्या प्रेमसंबंधात भावाचा अडथळा होऊ नये व इतरांना याचा सुगावा लागू नये म्हणून सारिका आणि तिचा प्रियकर सुधाकरने रमेशच्या हत्येचा कट रचला. हत्येच्या दोन दिवस अगोदर सुधाकर झांबरे रमेशला घेऊन जेवणासाठी धाब्यावर गेला होता. रमेशला दारु पाजली व परत जाताना डोक्यात जड वस्तूचा घाव घातला. डोक्यावर जोरदार घाव बसल्याने रमेशचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर मृतदेह डोंगरसोनी-वाघोली रस्त्यावरच टाकून सुधाकर झांबरे याने पळ काढला होता. हत्येनंतर दोन दिवसांनी रोजी रमेश झांबरे याचा मृतदेह सापडला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement