Breaking News LIVE : 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार  पावसाची शक्यता

Breaking News LIVE Updates, 6 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित सर्व बातम्या केवळ एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Sep 2021 03:35 PM
चंद्रपूर : सचिन तेंडुलकर यांनी पोळ्यानिमित्त केली बैलांची पूजा

चंद्रपूर : सचिन तेंडुलकर यांनी पोळ्यानिमित्त केली बैलांची पूजा. ताडोबा सफारीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या सचिन तेंडुलकर यांनी आज संध्याकाळी त्यांचा मुक्काम असलेल्या रिसॉर्टमध्ये बैलांची पूजा करून शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या रिसॉर्टजवळ असलेल्या तुकूम या गावातील 2 शेतकरी तेजराम खिरडकर आणि विनोद निखाडे आपली बैलजोडी घेऊन रिसॉर्टमध्ये आले होते. तेव्हा सचिन तेंडुलकर यांनी बैलांची पूजा केली आणि शेतकऱ्यांना टॉवेल आणि पैसे देऊन त्यांचे धन्यवाद मानले.

यवतमाळ शहरासह नेर तसेच पुसद परिसरात जोरदार हजेरी

यवतमाळ : आज सायंकाळी आलेल्या धुवाधार पावसाने यवतमाळ शहरासह नेर तसेच पुसद परिसरात जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्या व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. नेर तालुक्यातील वाई हातोला, पिंपरी कलगा, आनंदनगर, टाकळी सलामी या भागात  गारपीटसुद्धा झाली. पावसाळ्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे बैल पोळा सण साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली

6 ते 9 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार  पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार  पावसाची शक्यता आहे. ही माहिती  मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली, 

नाईट कर्फ्यु लावला जाणार नाही, विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई, पुणे सह अनेक शहरात कोरोना वाढत असल्याचे प्राथमिक संकेत आहेत.. समोर सणासुदीचा काळ आहे.. लोकांनी जास्त गर्दी करू नये, काही नवे निर्बंध लावण्यासाठी मुख्यमंत्री एक दोन दिवसात तज्ञांसोबत चर्चा करून निर्णय घेतील.. काही नवे नियम लागू केले जाऊ शकतील, मात्र ते दोन तीन दिवसात निर्णय घेतले जातील.. नाईट कर्फ्यु लावला जाणार नाही, तशी चर्चा ही आजच्या बैठकीत झालेली नाही...- मंत्री विजय वडेट्टीवार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम असलेल्या 'त्या' 11 जिल्ह्यांतील कनिष्ठ न्यायालयं पूर्ण क्षमतेनं सुरू करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम असलेल्या 'त्या' 11 जिल्ह्यांतील कनिष्ठ न्यायालयं पूर्ण क्षमतेनं सुरू करा


मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीचे निर्देश


पुणे, रायगड-अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, बीड आणि पालघरचा समावेश


परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यानं न्यायलयं 100 टक्के क्षमतेनं सुरू करण्याचे निर्देश

दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवात मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ,  चाकरमान्यांना गैरसोय होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेंची घोषणा

Breaking News LIVE : दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवात मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ,  चाकरमान्यांना गैरसोय होऊ नये यासाठी एकनाथ शिंदेंची घोषणा


टोलमाफीचे स्टिकर पुरवले जातील ,


त्यासाठी आपल्या वाहनांची नोंद करण्यात यावी ,


गणेश आगमनाच्या दोन दिवसआधी आणि गणेश विसर्जनानंतर दोन दिवस ही टोल माफी असेल
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-september-6-2021-maharashtra-political-news-1002177

गणेश भक्तांना इतर मंडळांचे गणपती पाहता येणार नाही, महाराष्ट्र शासनाची मंडळाना कोरोनाच्या पाश्वभूमीवर आवाहान 

गणेश भक्तांना इतर मंडळांचे गणपती पाहता येणार नाही, महाराष्ट्र शासनाची मंडळाना कोरोनाच्या पाश्वभूमीवर आवाहान 


लालबागच्या सर्व मंडळांची मुंबई पोलीस आणि पालिकेसोबत पार पडली बैठक 


लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक इ गणपती बाप्पांचे दर्शन ॲानलाईन

ममता बनर्जींचे भाचे अभिषेक बनर्जी ED कार्यालयात पोहोचले

Breaking News LIVE : ममता बनर्जींचे भाचे अभिषेक बनर्जी ED कार्यालयात पोहोचले, कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं 
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-september-6-2021-maharashtra-political-news-1002177

शरद पवार, वळसे पाटील, संजय राऊतांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन, जुन्नर, मंचर आणि आळेफाटा पोलिसांकडून गुन्हे दाखल

पुण्याच्या जुन्नर आणि मंचरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांसह विविध मंत्र्यांच्या उपस्थित पार पडलेल्या कार्यक्रमात गर्दी झाली होती. तसेच दोन दिवस आधी याच तालुक्यात आळे फाटा पोलिसांच्या हद्दीत शिवसेना खासदार संजय राऊत आले होते. तिथं झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात अशीच गर्दी उसळली होती. सामान्यांना निर्बंध आणि नेत्यांना कायद्यातून सूट अशी बातमी माध्यमांनी दाखवली त्यानंतर पोलिसांना जाग आलेली आहे. याप्रकरणी आता जुन्नर, मंचर आणि आळेफाटा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या कुटुंबियांच्या घरातून 100 तोळे दागिन्यांसह रोख 4 लाख रुपयांची चोरी

पुणे : माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या कुटुंबियांच्या घरातून 100 तोळे दागिन्यांसह रोख 4 लाख रुपयांची चोरी झाली आहे. पुण्यातील संगमवाडी गावात माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे पुतणे हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे यांच्या घरात चोरी झाली आहे. तिन चोरट्यांनी तब्बल 100 तोळे सोने आणि रोख चार लाख रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आलीय. या घटनेमुळे संगमवाडी परिसरात एकच खळबळ उडालीय. हरिश्चंद्र मनोहर मोझे आणि मोहन मनोहर मोझे या दोघांचे कुटुंब बाहेर गावी फिरण्यास गेले होते. तरी आल्यावर घरातील वस्तु इतरत्र पडलेल्या दिसल्या. कपाटातील दागिने, पैसे जागेवर नव्हते. घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. तीन चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून येरवडा पोलीस तपास करत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना करणं म्हणजे सुनियोजित षड्यंत्राचा भाग, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्रं

गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अख्तर यांना पत्रं लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा असं आव्हानच दिलं आहे. नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना दोन पानी पत्रं पाठवलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या संघाच्या तालिबानशी युती करण्याच्या मुद्द्याला आक्षेप घेतला आहे. संघाची तुलना तालीबानशी करणं हा सुनियोजीत षडयंत्राचा भाग आहे. तालिबानी प्रवक्त्यासारखी भुमिका घेत कुटनितीनं हिंदुत्वाशी तुलना करण्यात आली आहे. हिंदुत्वाबद्दल एवढा राग कशासाठी?, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. तसं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे.

सहाय्यक RTO अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची किरीट सोमय्या यांच्याकडून पाहणी

सांगली : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सहाय्यक RTO अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या तासगाव तालुक्यातील वंजारवाडी भागातील फार्म हाऊसची पाहणी केली आहे. अनिल परब यांचं काऊंटडाऊन सुरु झालंय, जसे उद्धव ठाकरे यांचे सचिन वाझे, अनिल देशमुख याचे पलांडे होते. तसे अनिल परब यांचे हे खरमाटे आहेत. ज्याच्याकडे मंत्र्यांनी बेनामी संपत्ती ठेवलीय. साडेसातशे कोटीची खरमटे यांची बेनामी संपत्ती असल्याचे माहिती आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले. 

संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप आक्रमक, गुन्हा दाखल करणार

संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केले. त्याविरोधात भाजपाकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही. समोरून कोथळा काढतो, त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केली असती का? या वक्तव्यावर आक्षेप घेत डेक्कन पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज देणार आहेत. 

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्येची यात्रा रद्द

पुणे : गेल्या वर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती अमावस्येची यात्रा रद्द करण्यात आलीये. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जेजुरी मंदिर प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलाय.  दरवर्षी सोमवती आमवसेला लाखो भाविक जेजुरीत यात्रेसाठी येत असतात. मागच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. त्यामुळे मार्तंड देवस्थान होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांनी जेजुरीत न येण्याचं  आवाहन करण्यात आलंय. सोमवती यात्रा जरी रद्द झाली असली तरी नित्याचे कार्यक्रम केलेत. दरवर्षी पालखीत देव कऱ्हा स्नानासाठी नेले जातात. परंतु यंदा गाडीतून नेण्यात आलेत. जेजुरीच्या इन्ट्री आणि इक्सिट पॉईंटला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जेजुरीत कलम 144 लागू करण्यात आलंय.


 
भाजपचे माजी खासदार  किरीट सोमय्या आज  सांगली दौऱ्यावर

भाजपचे माजी खासदार  किरीट सोमय्या आज  सांगली दौऱ्यावर आहेत. सध्या गाजत असलेले परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विषयीचे प्रकरणातील  सहाय्यक RTO अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या तासगाव  तालुक्यातील  मुळ गावी जाऊन त्याच्या प्रॉपर्टीची पाहणी ते करणार आहेत.  दुपारी सोमय्या याबाबतीत पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.

तरसाचा दोघांवर हल्ला, थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद

पुण्यात तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झालेत. खेड तालुक्यातील खरपुडी गावात घडलेली हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. एक तरुण वेळीच मदतीला धावल्याने वृद्ध सुदैवाने बचावले आहेत. सैरावैरा धावणाऱ्या तरासाची अज्ञात वाहनाला धडक लागली आणि त्यात तरसाचा मृत्यू झाला. काल ही घटना घडली. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडीओमध्ये एक वृद्ध रस्त्यावरून पायी निघालेले दिसतायेत. तेंव्हा लगतच्या झुडपातून अचानकपणे तरस बाहेर आला. पुढे पायी निघालेल्या वृध्दाचा हात त्याने अक्षरशः जबड्यात धरला. गावातील तरुण हातात काठ्या घेऊन याच तरसाच्या शोधात होते. सुदैवाने एक तरुण तिथंच तरसाचा शोध घेत होता. त्या तरुणाने तरसाला हुसकावून लावण्यासाठी काठीने प्रहार केला. काही वेळाने तरस धावला पण त्याने वृद्धाला गंभीर जखमी केले होते. तिथंच असणाऱ्या एकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात हा सर्व थरार कैद झाला. तसेच दुचाकीवरील आणखी एका व्यक्तीला चावा घेतला. नंतर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाच्या तोंडाला जबर मार लागला आणि जखमी अवस्थेतील तरसाचा नंतर मृत्यू झाला. अशी माहिती खेड वनविभागाने दिली.

हिरा पन्ना शॉपिंग सेंटरवर पोलिसांची धाड, लाखोंची डुप्लिकेट घड्याळं जप्त

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताडदेव परिसरातील प्रसिद्ध हिरा पन्ना शॉपिंग सेंटरमध्ये  धाड टाकली होती. या धाडीत त्यांनी नामवंत कंपन्यांच्या ब्रँडची डुप्लिकेट घड्याळं विक्री करणाऱ्यांचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी यासिन युसूफ मनकिया , मोहम्मद जिकर इस्माईल सुदिवाला ,दिनेश कुमार हाजीमल घोकर ,मोहम्मद राशीद मदार शेख  या चार आरोपींना अटक केली आहे. हिरा पन्ना शॉपिंग सेंटरमधून नामवंत ब्रँडचे 16 लाख 45 हजार रुपये किमतीचे डुप्लिकेट घड्याळं पोलिसांनी हस्तगत केली आहेत.  

अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत पुन्हा दिग्गजांची एन्ट्री

अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत पुन्हा दिग्गजांची एन्ट्री, पालकमंत्री यशोमती ठाकूर आज अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संचालक पदासाठी नामांकन दाखल करू शकतात..


या निवडणुकीत दोन मंत्री, चार आमदार सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या उमेदवारीने निवडणुकीतील चुरस वाढणार...

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात, दोघे गंभीर जखमी

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात. दोघे गंभीर जखमी. आसावरी पुरुषोत्तम जोशी (वय 26) आणि सागर चंद्रकांत तळशिकर (वय 44) जखमींची नावं. मुंबई वरून पुण्याला येत असताना त्यांच्या वाहनाने अज्ञात वाहनाला धडक दिली. यात त्यांच्या गाडीचा पुढचा भाग पाहिला की अपघाताची भीषणता लक्षात येते. चालक सागर बराच वेळ गाडीत अडकून राहिले. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बेळगाव महापालिकेवर कोणाची सत्ता? आज मतमोजणी

Belgaum Municipal Corporation Election : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. भाजप, काँग्रेस बरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे सोमवारी होणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.


बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी (Belgaum Municipal Corporation Election) एकूण 58 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप 55, काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. मतमोजणी केंद्रात पाचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे. शहरात मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात 1500 पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राकडे जाणारे सगळे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अनेक माजी महापौर, उप महापौर निवडणुकीपासून अलिप्त राहिले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात बहुतांश चेहरे नवीन आहेत.

आज शेवटचा श्रावणी सोमवार, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची आरास

आज पवित्र श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणजेच शेवटचा श्रावणी सोमवार. या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भक्त युवराज मुचलंबे यांनी विठ्ठल चरणी फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे. आज सोमवती अमावास्या आणि श्रावणी सोमवार असल्यानं हरिहराचं प्रतीक असलेल्या विठ्ठल मंदिरात अत्यंत मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराच्या चौखांबी आणि सोळखांबी मध्ये रंगसंगती साधत फुलांचे पडदे, फुलांची झुंबरं आणि मंडप बनविण्यात आला असून विठ्ठल रुक्मिणी समोर फुलांच्या आकर्षक रांगोळीच्या पायघड्या देखील घालण्यात आल्या आहेत. झेंडू, गुलछडी, गुलाब, लिली अशा विविध रंगांच्या फुलांचा या सजावटीसाठी वापर केला असून विठ्ठल मंदिरातील कर्मचारी असलेल्या शिंदे बंधू यांनी ही आकर्षक फुल सजावट साकारली आहे. 

पार्श्वभूमी

Belgaum Election Result : बेळगाव महापालिकेवर कोणाची सत्ता? आज मतमोजणी, 385 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला


Belgaum Municipal Corporation Election : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. भाजप, काँग्रेस बरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे सोमवारी होणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.


बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी (Belgaum Municipal Corporation Election) एकूण 58 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप 55, काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. मतमोजणी केंद्रात पाचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे. शहरात मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात 1500 पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राकडे जाणारे सगळे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अनेक माजी महापौर, उप महापौर निवडणुकीपासून अलिप्त राहिले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात बहुतांश चेहरे नवीन आहेत.


गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी 3 सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं असून आज, 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली होती. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडलं. 


Shravan 2021 : आज शेवटचा श्रावणी सोमवार, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची आरास


आज पवित्र श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणजेच शेवटचा श्रावणी सोमवार. या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भक्त युवराज मुचलंबे यांनी विठ्ठल चरणी फुल सजावटीची सेवा अर्पण केली आहे. आज सोमवती अमावास्या आणि श्रावणी सोमवार असल्यानं हरिहराचं प्रतीक असलेल्या विठ्ठल मंदिरात अत्यंत मनमोहक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराच्या चौखांबी आणि सोळखांबी मध्ये रंगसंगती साधत फुलांचे पडदे, फुलांची झुंबरं आणि मंडप बनविण्यात आला असून विठ्ठल रुक्मिणी समोर फुलांच्या आकर्षक रांगोळीच्या पायघड्या देखील घालण्यात आल्या आहेत. झेंडू, गुलछडी, गुलाब, लिली अशा विविध रंगांच्या फुलांचा या सजावटीसाठी वापर केला असून विठ्ठल मंदिरातील कर्मचारी असलेल्या शिंदे बंधू यांनी ही आकर्षक फुल सजावट साकारली आहे. 


संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता


ऑगस्ट संपता संपता महाराष्ट्राला वरुणराजाने काहीसा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत आहे. तसेच पूर्व पश्चिम वाऱ्यांचा वेग चांगला असल्यानं दक्षिणेसह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. देशासह महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यात मागील 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे. त्यात काल मराठवाड्यातील अनेक धरणांच्या पाणीपातळीत देखील चांगली वाढ झाली आहे. 


कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात चक्रीय स्थितीत याचे रुपांतर होत असल्याने विदर्भात आजपासून पुढील 2 दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात देखील पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस बघायला मिळू तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.