Breaking News LIVE : राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा

Breaking News LIVE Updates, 5 Septembe 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित सर्व बातम्या केवळ एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Sep 2021 07:34 PM
सोलापुरात दुसऱ्या दिवशी ही मुसळधार पाऊस, शहरासह आसपासच्या तालुक्यातही पाऊस

सोलापुरात दुसऱ्या दिवशी ही मुसळधार पाऊस, शहरासह आसपासच्या तालुक्यातही पाऊस, जवळपास अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस

राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचे इशारा

राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचे इशारा आज IMD ने परत दिले आहेत. खास करून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल. 7-8 ला कोकण, मध्य महाराष्ट्र तिव्रता जास्त सोबत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागीरी ओरेंज इशारा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण, उद्या 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार

राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण, उद्या 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार

राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल

राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल. नृसिंहवाडी इथं इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात  पोहचले..


 

सांगली, जिल्हा आणि कर्नाटकातील काही पुलांमुळे पूर यायला लागला

LIVE | राजू शेट्टी लाईव्ह



  •  सांगली, जिल्हा आणि कर्नाटकातील काही पुलांमुळे पूर यायला लागला

  •  यावर कायम स्वरूपी उपाय करणे गरजेचं आहे

  • काही मंत्र्यांनी भिंत बांधण्याची कल्पना मांडली, पण ते शक्य होईल असं वाटत नाही

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायम वादाचा विषय राहिला आहे

LIVE | राजू शेट्टी लाईव्ह



- अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायम वादाचा विषय राहिला आहे

परभणी जिल्ह्यात सर्वंदूर पाऊस.. नद्या, प्रकल्प तुडुंब

परभणी जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासुन पडत असलेल्या सर्वदूर पावसाने नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत तर लोअर दुधना प्रकल्प ओव्हर फ्लो झाला असुन प्रकल्पाच्या 20 पैकी 16 दरवाज्यांमधून 30 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा दुधना नदीपात्रात केला जातोय. त्यामुळे दुधना नदी तुडूंब भरून वाहत आहेत. तिकडे मराठवाड्यातील दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या येलदरीतही 91% एवढा पाणी साठा झालाय. तसेच गोदावरी वरील ढालेगाव बंधाऱ्याचे हि 15 दरवाजे उघडण्यात आले असल्याने गोदावरी नदी हि दुथडी भरून वाहत आहे. एकुणच जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरु असल्याने येणाऱ्या काळात नद्यांना पुर येण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने गोदावरी,दुधना,पुर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बीड जिल्ह्याला पावसाचा फटका, सात तालुक्यात नुकसान, 33 मंडळात अतिवृष्टी

बीड जिल्ह्यातील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी पाणी पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील सात तालुक्यात म्हणजे बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, अंबाजोगाई, केज, शिरूर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नद्या पुन्हा एकदा तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. लघु आणि मध्यम प्रकल्प भरून वाहत आहेत 

राजू शेट्टींच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल, रात्रीपासून प्रशासनाचा राजू शेट्टींशी संवाद सुरू

राजू शेट्टींच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल,


रात्रीपासून प्रशासनाचा राजू शेट्टींशी संवाद सुरू,


नृसिंहवाडी पर्यंत विनाअडथळा सोडण्याची शेट्टींची मागणी,


अडवण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्युत्तर देणार- राजू शेट्टी,


संवादाची दारे नेहमीच उघडी, मला हा प्रश्न प्रतिष्ठचा करायचा नाही,


राजू शेट्टींची सरकारला पुन्हा एकदा 4 वाजेपर्यंतची वेळ,


शेट्टींच्या पंचगंगा परिक्रमेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रशासन हादरले,


चार वाजता पुढील भूमिका जाहीर करणार- राजू शेट्टी,

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यक्रमात मोठी गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन, गृहमंत्री स्वत: मंचावर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली आहे. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर असताना हे घडत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. एकीकडे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्व मंत्री जनतेला गर्दी करू नका. असं आवाहन करतायेत. लग्न कार्याच्या उपस्थितीला देखील अद्याप बंधनं कायम आहेत. असं असताना शरद पवारांच्या उपस्थितीत आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्या समोर पार पडणाऱ्या कार्यक्रमात सर्व नियम आणि आवाहन धाब्यावर बसवले जातायेत.

नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे कन्हान नदीच्या काठावर असलेल्या 'अम्माची दर्गा' या ठिकाणी 5 जण बुडाल्याची माहिती

नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे कन्हान नदीच्या काठावर असलेल्या "अम्माची दर्गा" या ठिकाणी 5 जण बुडाल्याची माहिती...


मिळालेल्या माहितीप्रमाणे यवतमाळमधील दिग्रस तालुक्यातून सुमारे दहा जण अम्मा ची दर्गा या ठिकाणी होत असलेल्या उर्स मध्ये सहभागी होण्यासाठी आले होते..


त्यापैकीच पाच जण आज सकाळी नदीत बुडाल्याची माहिती आहे.. 

राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

राजू शेट्टी यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

राक्षसभुवन येथील शनीचे मंदिर पाण्याखाली

मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे गेवराई तालुक्यातील सातही लघुप्रकल्प एकाच रात्रीत तुडूंब भरले असून नदी, नाले तसेच अमृता नदी, गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. राक्षसभुवन येथील शनीचे मंदिर पाण्याखाली गेले आहे.

 

गोदावरी नदीला पाणी वाढल्याने राक्षसभुवन मधले गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या शनिमंदिर आला पाणी लागले असून पात्राकडील मंदिराचा भाग पाण्याखाली गेला आहे

 

भोजगाव येथे अमृता नदीचे पाणी गावात शिरल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तसेच गोदावरीला आपेगाव-हिरपुरी बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे, तसेच तालुक्यातील नद्यातून जाणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. यामुळे गोदाकाठी असलेल्या राजापूरला पुन्हा एकदा पाण्याने वेढा घातला याच पाण्याने पात्र सोडल्याने अनेक ठिकाणी सखल भागात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस
बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी गावात पाणी शिरलं आहे तर शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे..गेवराई तालुक्यातल्या भोजगाव येथील अमृता नदीवरचा पूल वाहून गेल्याने नदीच पाणी गावात शिरल्याने अनेक घरांच नुकसान झालं आहे तर शेतातले पीक देखील या पुरात वाहून गेल आहे..तर गोदावरी आणि सिंदफना नदीला पूर आल्याने देखील शेतीच मोठं नुकसान झालं आहे..
नृसिहवाडी इथं जलसमाधी आंदोलन करू नका अन्यथा कायदेशीर कारवाई करू, पोलिसांचा इशारा

शिरोळ पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. कृष्णा नदीचे पात्र खोल असल्याने जलसमाधी आंदोलन केल्याने जीवित हानी होऊ शकते असं सांगत जलसमाधी आंदोलन करायला कोणालाही प्रवृत्त करू नका असा इशारा पोलिसांचा नोटीसद्वारे दिला आहे. गेल्या पाच दिवसापासून कोल्हापूर जिल्हामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंचगंगा परिक्रमा हे आंदोलन सुरू आहे.आज पाचव्या दिवशी नृसिंहवाडी इथं सर्व आंदोलक सरकारच्या विरोधात जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर केलय.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं बुरखा घालण्याचा प्रयत्न, नागपूर वॉकर्स स्ट्रीटवरची घटना

काल जागतिक हिजाब दिनानिमित्त नागपुरात एक धक्कादायक घटना घडली. उपराजधानीतील वॉकर्स स्ट्रिटवर एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं बुरखा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी इस्लामिक ऑर्गनायजेशनचं पत्रही सापडलं आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीनं जेव्हा विरोध केला, तेव्हा पुरुष सहकाराऱ्यांसोबत आलेल्या बुरखाधारी महिलांनी तिथून पळ काढला. आता अल्पवयीनं मुलीला बुरखा घालण्याची जबरदस्ती का करण्यात आली आणि हे टोळकं नेमकं कोण आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.  

बॅडमिंटनमध्ये तरुण ढिल्लन कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत

बॅडमिंटनमध्ये तरुण ढिल्लन कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत, इंडोनेशियाच्या खेळाडूकडून पराभव

सेलिब्रेटी महिलेचा फोटो वापरुन हनी ट्रॅप; दिल्लीतील डॉक्टरला 2 कोटींचा गंडा

लोकप्रिय विदेशी महिला सेलिब्रेटीचा फोटो वापरत दिल्लीच्या डॉक्टरवर हनी ट्रॅप केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला बनून जाळ्यात अडकवणाऱ्या यवतमाळच्या आरोपीला पोलीसांनी पकडले असून तब्बल 2 कोटी रुपयांची  फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.  सोशल मीडियाचा वापर करुन दिल्लीच्या प्रतिष्ठित डॉक्टरला हनी ट्रॅप द्वारे तब्बल 2 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.  महिला बनून डॉक्टरला जाळ्यात अडकविणाऱ्या पुरुष आरोपीला यवतमाळ पोलीसांनी 24 तासात बेड्या घातल्या आहे.


आपण स्मार्ट फोन वापरत असलो तरी बरेच व्यक्ती स्मार्ट फोन वापरण्याइतपत स्मार्ट आहोत काय हे आज तपासून पाहण्याची गरज आज आहे. बरेचदा फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते किंवा स्वीकारली जाते. काहीवेळी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणारी व्यक्ती नेमकी कोण कुठली याची खातरजमा न करता फक्त सुंदर चेहऱ्यावर मोहित होऊन मैत्री करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय दिल्लीच्या एका प्रसिद्ध नामांकित डॉक्टरला यवतमाळमध्ये आला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई आणि लगतच्या उपनगरांत आज मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Update : पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत आज मुसळधार आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरांत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुढच्या चार दिवसांत राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट दिला आहे. 

Kolhapur Earthquake : भूकंपाच्या धक्क्यानं कोल्हापूर हादरलं; भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल

कोल्हापुरात काल रात्री 11 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणावला आहे. 3.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यानं कोल्हापूर हादरलं. कोल्हापूरपासून 19 किलोमीटर पश्चिमेकडे भूकंपाचं केंद् असल्याची माहिती. 






Seismo.gov.in च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे रात्री 11 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. कोल्हापुरपासून 19 किलोमीटर पश्चिमेकडे भूकंपाचे केंद्र असल्याचंही म्हटलं जात आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली. 

पार्श्वभूमी

केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मागत बसण्यापेक्षा, राज्य सरकारनं तत्काळ गोळा करावा; ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची मागणी


मागील काही दिवसांपासून सातत्यानं केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र तो अद्याप मिळालेला नाही. 4 मार्चला सुप्रीम कोर्टात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत निर्णय आलेला आहे. कोर्टानं तत्काळ इम्पिरीकल डेटा सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. मात्र आद्यप इम्पिरिकल डेटा सरकारनं गोळा केला नाही. त्यामुळं राज्य सरकार ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कसं टिकवणार? हा प्रश्न आहे. जर ओबीसी समाजाचं स्थानिक स्वराज संस्थांमधील राजकीय आरक्षण टिकवायचं असेल तर इम्पिरिकल डेटा तत्काळ उपलब्ध करावा. अन्यथा राज्यातील 56 हजार स्थानिक स्वराज संस्थांमधील उमेदवारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं केंद्राकडं डेटा मागत बसू नये तत्काळ राज्यात आयोगाला आर्थिक मदत देऊन ओबीसी आरक्षण पूर्ववत करावं, अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. 


याबाबत अधिक बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, "ओबीसी आरक्षण थांबलं आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने थांबलं आहे. कोर्टाचा निकाल येऊन आता 6 महिने झाले आहेत. त्यामध्ये कोर्टानं स्पष्ट नमूद केलं आहे की, एक आयोग नेमा आणि त्यांच्याकडून डेटा गोळा करा. हे सहा महिने झाले तरी यांनी काहीच केलं नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे केंद्राकडे मागत बसण्यापेक्षा तत्काळ राज्यानं डेटा गोळा करायला सुरुवात करा." 


सहाय्यक आयुक्त पिंपळे हल्ला प्रकरण; आरोपीला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी


मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर आणि सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी अमरजीत यादव याला शनिवारी कासारवडवली पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजार केलं. यावेळी ठाणे न्यायालयाने यादव याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


अटकेतील आरोपी अमरजीत यादव याला कासारवडवली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयानं दिली होती. शनिवारी कोठडीची मुदत संपल्यानं पुन्हा ठाणे न्यायालयात हजार केल्यानंतर पोलिसांच्या पोलीस कोठडीवर आरोपीचा तपास पूर्ण झाला असून त्यानं गुन्ह्यात वापरलेले हत्यार चाकू हाही पोलिसांनी जप्त केल्यानं ठाणे न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपी अमरजीत यादव याची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आरोपी अमरजीत यादव याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, प्राणघातक हल्ला करणं अशा कलमांतर्गत नोंद करण्यात आलेली होती. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.