Breaking News LIVE : महाराष्ट्रात आजपर्यंत 116 टक्के पाऊस, सरासरीच्या 1454.37 मिमी पाऊस

Breaking News LIVE Updates, 21 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Sep 2021 07:30 PM
महाराष्ट्रात आजपर्यंत 116 टक्के पाऊस, सरासरीच्या 1454.37 मिमी पाऊस

मराठवाड्यात 1 जूनपासून आजपर्यंत 800 मिमी पावसाची नोंद, सरासरीच्या तब्बल 29 टक्के अधिकचा पाऊस. कोकण व गोव्यात सरासरीच्या 21 टक्के अधिकच्या पावसाची नोंद, आतापर्यंत 3350 मिमी पावसाची नोंद. मध्य महाराष्ट्रात 776.6 मिमी पाऊस, सरासरीच्या 11 टक्के अधिकचा पाऊस.


विदर्भात 98 टक्के पाऊस, विदर्भात 21 सप्टेंबरपर्यंत 910.7 मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र, 1 जूनपासून आजपर्यंत 890.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत 97 टक्के पाऊस, सरासरीच्या 810.6 मिमी पाऊस.

सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेपर्यंत घाट परिसरात किती पाऊस?

अंबोणी - 54 मिमी 
लोणावळा ऑफीस - 51 मिमी 
डोंगरवाडी - 48 मिमी 
वाळवण - 42 मिमी 
दावरी - 40 मिमी 
लोणावळा टी - 36 मिमी 
भिवपुरी - 32 मिमी 
शिरोटा - 32 मिमी 
मुळशी कॅम्प - 28 मिमी 
मुळशी बंगलो - 26 मिमी 
खांडी - 20 मिमी

पिंपरी चिंचवड शहरातील जलतरण तलाव खुली

पिंपरी चिंचवड शहरातील जलतरण तलाव खुली होणार. मात्र केवळ जलतरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाच मुभा असेल. जलतरण प्रशिक्षकांचे लसीचे दोन्ही डोस असणं बंधनकारक आहे. सर्व उपाययोजना नुसार हे आदेश उद्यापासून लागू होतील. तसं परिपत्रक पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे.

परभणीच्या येलदरी धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडले

कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पाबरोबर छोटे ही प्रकल्प तुडूंब भरले आहेत. सकाळी सेलूच्या लोअर दुधना प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले होते. या पाठोपाठ जिंतुर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाचेही 10 पैकी 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. येलदरीच्या 10 दरवाज्यातून 23798 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा पुर्णा नदीपात्रात सोडण्यात आलाय. ज्यामुळे दुधना नदी पाठोपाठ पुर्णा नदीलाही पुर आलाय. ज्यामुळे दोन्ही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीत सकाळपासून पावसाची रिपरिप

कल्याण डोंबिवली शहरात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासुन कल्याण डोंबीवलीमध्ये पावसाची रिपरिप सुरू असून काही कालावधीसाठी विश्रांती घेत अधून मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. अधून मधून कोसळणाऱ्या सरीमुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे.

पुढील 2 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र वादळी पाऊस, विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

पुढील 2 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र वादळी पाऊस, विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज.


कोकणात पुढील 2 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, आज संपूर्ण कोकणासाठी यलो अलर्ट जारी, 64 मिमी ते 115 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त, उद्या उत्तर कोकणात मुसळधारेचा इशारा, पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस, चारही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी 


मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात विजांसह मुसळधारेचा अंदाज व्यक्त, पुणे, नाशिक, साताऱ्यातील घाट माथ्यावर चांगल्या पावसाचा अंदाज, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी 


मराठवाड्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, वाऱ्यांचा वेग अधिक राहणार 


आज आणि उद्या संपूर्ण विदर्भात वादळी पावसाचा अंदाज, वाऱ्यांचा वेग अधिक असणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, संपूर्ण विदर्भासाठी आज आणि यलो अलर्ट जारी

नवोदित अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू
गोव्यात झालेल्या एका भीषण अपघातात पुण्यात राहणाऱ्या नवोदित अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल  पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. ईश्वरी उमेश देशपांडे (25) आणि शुभम देडगे (25) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. येथील ईश्वरी देशपांडे ही नवोदित अभिनेत्री होती. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ईश्वरी आणि शुभम हे सोमवारी पहाटेच्या सुमारास गोव्यातील अंजुना बीचकडे निघाले होते. याकडे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अरुंद रस्त्यावरून जात असताना त्यांची कार एका झाडाला धडकली आणि जवळच असणाऱ्या खाडीत जाऊन कोसळली. बुडत असताना या दोघांनीही आम्हाला वाचवा असा धावा केला. परंतु पहाटेची वेळ असल्याने आणि अंधार असल्यामुळे कोणीही त्यांना वाचवू शकले नाही. दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ईश्वरी आणि शुभम यांच्यात अनेक वर्षापासून मैत्री होती. त्यातूनच त्यांची मने जोडली होती आणि लवकरच ते लग्नही करणार होते. ईश्वरी पाषाण-सुस परिसरात तर शुभम हा नांदेड सिटी भागात राहत होता. साखरपुडा होण्याआधी दोघांनी गोव्याला फिरण्यासाठी जाण्याचा प्लॅन केला होता. परंतु गोव्याच्या दिशेने जात असतानाच दुर्दैवी अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
इयत्ता चौथीत शिकणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाचा शेततलावात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू

बारामती : इयत्ता चौथीत शिकणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाचा शेततलावात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना इंदापूर शहरात घडली आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्याचे मृत शरीर तलावातून बाहेर काढण्यात आले. आर्यन मच्छीन्द्र नाथजोगी असं मृत मुलाचे नांव आहे. या घटनेमुळे संपूर्ण भागात शोककळा पसरली आहे. सोमवारी  सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास आर्यन हा क्रीडासंकुलाच्या मैदानावर दोघा मित्रांसोबत खेळायला गेला होता.खेळून झाल्यानंतर आर्यन आणि त्याचे दोघे मित्र हात-पाय धुण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. मात्र पाय घसरून आर्यन शेततळ्यात पडला. यावेळी त्याचे सोबत असणारे इतर दोन मित्र घाबरून गेले.त्यांनी त्या ठिकाणहून पळ काढला. या घटनेची वाच्यता ही त्यांनी कुठेही केली नाही.सोमवारी सायंकाळी सरस्वतीनगर येथील गणेश मंदिरापाशी खेळत असताना आर्यन बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी इंदापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे इंदापूर पोलीस, कुटुंबीय आणि शेजाऱ्यांकडून आर्यनचा शोध सुरू होता. आज सकाळी त्याच्या मित्रांनी सोमवारी तलावावर घडलेली घाटना उघड केल्याने आर्यनचा शोध लागला.मात्र तो मृतावस्थेत आढळून आला. आर्यनचे वडील हे डाळिंब मार्केटमध्ये मजुरीसाठी तर आई सोनाई डेअरीवर कामाला जातात.

परभणी बलात्काराप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु, पालकमंत्री नवाब मलिक यांची माहिती

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर 12 सप्टेंबर रोजी 3 तरुणांकडून  बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.महत्वाचे म्हणजे या आरोपींमधील एक जण हा अल्पवयीनच आहे.घटनेनंतर पीडित तरुणीने विषारी औषध प्राशन केले आहे.उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. 


माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांनी 17 कोटी रुपये दडवले, कारवाईबाबत आयकर विभागाची माहिती

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नाहीत. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. अशातच आता अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली आहे. 


 


मुंबै बॅंकेला अ दर्जा मिळणं हे आमच्यावर आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर: प्रवीण दरेकर

डिझास्टर रिकवरी साईट नूतनीकरण व उभारणी करण्याच्या नावाखाली बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी बनाव रचून पुण्यातील साईटला भेट देऊन पाहणी केल्याचं दर्शवल्याचा आरोप आहे. परंतु प्रत्यक्षात ज्याला कंत्राट द्यायचे होते त्यालाच ते कंत्राट देण्यात आले. इतकंच नव्हे तर कंत्राटापोटी कोटी 90 टक्के रक्कम तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली. याबद्दलही आव्हालात म्हटलं गेलं आहे.


दोन पक्षांनी दिलेली खासदारकीची ऑफर नाकारली; अभिनेता सोनू सूदचा गौप्यस्फोट

बॉलिवूड अभिनेता आणि गरिबांचा मसिहा अशी ओळख असलेल्या सोनू सूदवर (Sonu Sood) आता टॅक्स चोरीचा आरोप झाला आहे. इन्कम टॅक्स विभागाने सोनू सूदवर 20 कोटी रुपयांच्या टॅक्स चोरीचा आरोप लावला असून या प्रकरणावर आता त्याने आपलं मौन सोडलं आहे. आपण कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नसून दोन पक्षांनी दिलेल्या राज्यसभेच्या खासदारकीची ऑफर नाकारली असल्याचं सोनू सूदने सांगितलं. 

मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड'चा लोगो

मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या सोसायटी, इमारती आणि कार्यालयांवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' म्हणजे, पूर्णपणे कोरोनाची लस घेतलेली इमारत, असा फलक लावण्यात येणार आहे. मुंबईकरांना प्रोत्साहित करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना आणली आहे. इमारतीमध्ये राहणाऱ्या अथवा काम करणाऱ्या अशा सर्वांचं लसीकरण झालेलं असेल, तर इमारतीच्या प्रेवशद्वारावर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा एक लोगो लावण्यात येईल आणि त्यासाठी इमारतीमधील सर्व पात्र व्यक्तींचे दोनही कोरोना लसीचे डोस झालेले असणं आवश्यक आहे. या लोगोमुळे कोरोना प्रसाराचा धोका कमी होईल आणि इतरांनाही प्रोत्याहन मिळेल, अशी अपेक्षा मुंबई महानगरपालिकेला आहे. 

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर, म्हणाले...

"साकीनाक्यातील घटनेने राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हिच चिंता आम्हालाही आहेच. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल.", असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलंय. 

साकीनाका प्रकरणी दोन दिवसाचं अधिवेशन घ्या, राज्यपालाचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

साकीनाका प्रकरणात आता राज्यपालांनी उडी घेतली असून या प्रकरणी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन घ्या असं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. महिला सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेवर अधिवेशन घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

चंद्रपुरात मुसळधार पाऊस, रस्ते जलमय

चंद्रपुरात पावसाची मुसळधार हजेरी, मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरातील दैनंदिनी विस्कळीत, आज सकाळपासून शहर जिल्ह्यात आकाश होते ढगाळलेले, गेले तासभर मुसळधार पावसाने रस्ते केले जलमय, कार्यालयात जाणाऱ्या नोकरदार वर्गाची सकाळच्या पावसाने केली पंचाईत, जिल्ह्यातील वार्षिक पावसाची टक्केवारी आता 85 टक्‍क्‍यांवर, दमदार पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा 


 

गायीच्या दुधात भेसळ करून नागरिकांची जीवाशी खेळ, सिन्नर मधील धक्कादायक घटना

सिन्नर तालुक्यातील पाथरे गावातील स्वामी समर्थ दूध संकलन केंद्रातील खळबळजनक प्रकार .
अन्न व सुरक्षा विभागाने टाकलेल्या छाप्यात 320 लिटर भेसळयुक्त दूध आढळले.
पॅराफीन पावडर, सोबायीन तेल आणि रंगहीन द्रव्य मिसळत केली जात होती भेसळ. 
केंद्र चालक अक्षय गुंजाळ सह चार जणांवर वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.  
अन्न, सुरक्षा व मानके अधिनियम व मानवी जीवितास धोका उद्धवेल असे कृत्य केल्याचा आरोप.

खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ईडी चौकशी

यवतमाळ : वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत काम करणारा एका कर्मचाऱ्यारी फारुक जौहर याला ईडीनं चौकशीसाठी बोलवले होते. 30 ऑगस्ट रोजी भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीनं धाडी टाकल्या होत्या. वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि इतर ठिकाणच्या संस्थांमध्ये जात झडती घेण्यात आली होती. ईडीनं भावना गवळी यांच्या एका संस्थेतील दोन कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ते उपस्थित झाले नव्हते. आज मात्र भावना गवळी यांच्या संस्थेत काम करणारा एक कर्मचारी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. गवळींनी 55 कोटींचा बालाजी पार्टीकल बार्ड कारखाना 25 लाखांत घेतला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. यासंदर्भात सोमय्यांनी विविध तपास यंत्रणांना पत्र लिहीत तक्रार केली होती. त्यानंतर भावना गवळी यांच्या विविध संस्थांवर ईडीकडून 30 ऑगस्ट रोजी धाडी टाकण्यात आल्यात.

कोविड काळात शैक्षणिक फी माफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने मार्डचे निवासी डाॅक्टर संपाच्या तयारीत

मुंबई : कोविड काळात शैक्षणिक फी माफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने मार्डचे निवासी डाॅक्टर संपाच्या तयारीत, सेंट्रल मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत निर्णय. तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास पुढील आठवड्यात राज्यस्तरीय आंदोलन उभारण्याचा ठराव मार्डच्या बैठकीत पारीत. 

राज्याची उपराजधानी नागपूर हत्येच्या गुन्ह्यात पहिल्या क्रमांकावर

नागपूर : गंभीर गुन्ह्यांसाठी नेहमीच चर्चेत असणारी उपराजधानी नागपूर आता गुन्ह्यांच्या बाबतीत देश पातळीवर गुन्ह्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटणा, लखनऊ आणि दिल्लीसारख्या शहरांना मागे टाकत असल्याचे समोर आले आहे. आणि हे आम्ही नाही तर नेशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवे अहवाल म्हणत आहे. दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या गुन्ह्यात नागपूरने देशात पहिला क्रमांक पटकावला असून राज्यातील पुणे आणि मुंबई सारखे इतर महानगर या यादीत अनुक्रमे 10 व्या आणि 16 व्या क्रमांकावर आहेत.

कोविड काळात शैक्षणिक फी माफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने मार्डचे निवासी डॉक्टर संपाच्या तयारीत

कोविड काळात शैक्षणिक फी माफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने मार्डचे निवासी डॉक्टर संपाच्या तयारीत असून सेंट्रल मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास पुढील आठवड्यात राज्यस्तरीय आंदोलन उभारण्याचा ठराव मार्डच्या बैठकीत पारीत करण्यात आला आहे.

 पुरेशा लससाठ्याअभावी मुंबईत 316 पैकी केवळ 73 लसीकरण केंद्र सुरु राहणार

आज मुंबईतील सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर मर्यादीत लससाठा उपलब्ध असल्यामुळं मर्यादीत लससाठा उपलब्ध असल्यानं मर्यादित लसीकरण केंद्रांवर लसीकरण केलं जाईल. मुंबईत 316 पैकी 73 सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्र सुरु राहणार आहेत.

पार्श्वभूमी

Mumbai Vaccination : आज मुंबईत 316 पैकी 73 सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्र सुरु राहणार, पुरेशा लससाठ्याअभावी निर्णय
देशासह राज्यातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजनाही केल्या जात आहेत. सध्या तरी कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हेच प्रमुख अस्त्र असल्याचं बोललं जात आहे. देशभरात सध्या लसीकरण मोहीम सुरु आहे. परंतु, वारंवार लसीकरण मोहिमेत पुरेशा लसीसाठ्याअभावी वारंवार अडथळे येत आहेत. आज म्हणजेच, 21 सप्टेंबर रोजी मुंबईतील सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्रांवर मर्यादीत लससाठा उपलब्ध असल्यामुळं मर्यादीत लससाठा उपलब्ध असल्यानं मर्यादित लसीकरण केंद्रांवर लसीकरण केलं जाईल. 


KKR vs RCB, Match Highlights : कोलकाताचा बंगळुरुवर नऊ विकेट्सने विजय
KKR vs RCB, Match Highlights : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना आज शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आला. विराट कोहलीच्या बंगळुरुची  दुसऱ्या टप्प्यातील  सुरुवात निराशाजनक झाली. मॉर्गनच्या कोलकाता संघाने  धुव्वा उडवला. कोलकाताने बंगळुरुवर नऊ विकेटनी मात केली. कोलकाताने 10 षटक राखून बंगळुरुचे आव्हान पूर्ण केले. कोलकाताने 10 षटकात 93 धावाचे लक्ष्य सहज मिळवले. शुभमन गिलने 48 आणि व्यंकटेश अय्यर नाबाद 41 धावा केल्या. बंगळुरकडून यजुवेंद्र चहलने एक विकेट घेतले. शुभमनने 6 चौकार आणि एका षटकारासह 48 धावा केल्या.


Vaccine Maitri Program : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना लसी पुरवणार, आरोग्यमंत्री मांडविया यांची माहिती
पुढील महिन्यापासून भारत पुन्हा इतर देशांना कोरोना लसीचे डोस पुरवण्यास सुरुवात करेल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया  (Mansukh Mandaviya) यांनी ही माहिती दिली आहे.  देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना भारताने 5 मे पासून कोरोनावरील लसींच्या निर्यातीवर बंदी घातली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, वॅक्सिन मैत्री अंतर्गत ऑक्टोबरपासून पुन्हा पुरवठा सुरू केला जाईल. COVAX कार्यक्रमांतर्गत लसींचा पुरवठा करून भारत वसुधैव कुटुम्बकमचे ध्येय पूर्ण करेल . यामुळे जगाला कोरोनाविरोधात एकत्र लढण्यास मदत होईल. 


कंगनाला कोर्टावर भरवसा नाय... अंधेरी दंडाधिकारी कोर्टातील मानहानीचा खटला दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी
लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणी अखेर अभिनेत्री कंगना रनौत सोमवारी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर झाली. कंगनाच्यावतीनं तिच्याविरोधात तक्रार दाखल करणा-या जावेद अख्तर यांच्याविरोधात खंडणीची तक्रार कोर्टाला दिली गेली. मात्र या कोर्टावर आता आपला भरवसा नाही, असं स्पष्ट करत ही सारी प्रकरणं दुस-या कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज कोर्टापुढे सादर केला. आपली बाजू न ऐकता बेकायदेशीरपणे आपल्याविरोधात अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी धमकी देण्यात येते, असा आरोप कंगनानं या अर्जातून केला आहे. कोर्टानं या अर्जाचा स्वीकार केला असून जोपर्यंत मुख्य दंडाधिकारी न्यायाधीश यावर निकाल देत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाला स्थगिती देत सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. मुख्य दंडाधिकारी यावर 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.