Bus Accident : नाशिक-गुजरात महामार्गावरील (Nashik-Gujarat Highway) सापुतारा घाटात (Saputara Ghat) भीषण अपघाताची (Bus Accident) घटना घडली आहे. खाजगी लक्झरी बस 200 फुट दरीत कोसळली असून यात सात प्रवाशांचा करुण अंत झाला. तर 15 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले आहेत. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शिवपुरी, गुना आणि अशोकनगर जिल्ह्यांतील भाविक 23 डिसेंबरला धार्मिक यात्रेला निघाला होता. या भाविकांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातमधील (Gujarat) वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. यानंतर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे देवदर्शन करून गुजरातच्या द्वारका येथे भाविक जात होते. 


बस 200 फूट दरीत कोसळली


आज रविवारी (दि. 02) पहाटे  5:30 वाजेच्या दरम्यान नाशिक - सुरत महामार्गावरील सापुतारा घाटात (Saputara Ghat) बस अचानक 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 15 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. या बसमध्ये एकूण 48 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. 


बसचे अक्षरशः दोन तुकडे


अपघात इतका भीषण होता की, यात बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बसचा अपघात नेमका कसा झाला? याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावरुन सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बसचा सांगाडा देखील घटनास्थळावरुन हटवण्याचे काम सुरू आहे.


अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे 


आतापर्यंत पाच मृतांची ओळख पटली आहे. 


रतनलाल जाटव, बस चालक


भोलाराम कुशवाह, रा. रामगड, शिवपुरी


गुड्डी राजेश यादव, रा. रामगड, शिवपुरी


कमलेश वीरपाल यादव, रा. रामगड, शिवपुरी


ब्रिजेंद्र उर्फ ​​पप्पू यादव, रा. बिजरौनी, शिवपुरी.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Nashik Accident : महाकुंभमेळ्याला गेलेल्या रत्नागिरीतील तिघांचा अपघात, निवृत्त प्राध्यापकांसह 3 जणांचा दुर्दैवी अंत


धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप