Breaking News LIVE : शरद पवार आणि नितिन गडकरींमध्ये उद्या पुणे विमानतळावर भेट होणार
Breaking News LIVE Updates, 30 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
शरद पवार आणि नितिन गडकरींमध्ये उद्या पुणे विमानतळावर भेट होणार आहे. सकाळी 9 वाजता दोघांमध्ये भेट होणार आहे. राज्यातले महामार्गांसंदर्भात दोघांमध्ये भेट होणार असल्याची माहिती आहे. खासदार सुनिल तटकरे देखील उपस्थित राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गासंदर्भात खासदार सुनिल तटकरे गडकरींना निवेदन देणार आहे.
परमवीर सिंह प्रकरणी एकीकडे चांदीवल आयोगाची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे त्यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट देखील परमवीर सिंग यांनी दिलेले नाही. त्यामुळे परमवीर सिंग यांना मेडिकल बोर्ड समोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. एकूणच सर्व कायदेशीर बाबी तपासून नंतर सरकार निलंबनाची प्रक्रिया करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडनं अनिल देशमुखांना समन्स जारी केली आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. ईडीची देशमुख तपसात सहकार्य करत नसल्यामुळे विशेष कोर्टात याचिका केली आहे. वारंवार समन्स बजावूनही देशमुख चौकशीला गैरहजर राहिले आहे.
परमबीर सिंह यांच्या निलंबनाबाबत राज्य सरकारची सावध भूमिका, राज्य सरकार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निलंबनाची प्रक्रिया सुरू करणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांसोबतची बैठक संपली
परमबीर प्रकरणी एकीकडे चांदीवल आयोगाची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे त्यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत.
त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट देखील परमबीर सिंह यांनी दिलेले नाही.
त्यामुळे परमवीर सिंग यांना मेडिकल बोर्ड समोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.
एकूणच सर्व कायदेशीर बाबी तपासून नंतर सरकार निलंबनाची प्रक्रिया करणार, सूत्रांची माहिती
पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल तीन लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.
दोन मित्रांमध्ये पैशावरून वाद झाल्यानंतर एका मित्राने बाटलीत पेट्रोल आणून पेट्रोल टाकत त्या मित्राला जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणाचा काही तासांत उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. संतोष दादाराव कागदे (वय 51, रा. हडपसर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मनोज मोहन कांदे (वय 28) याला अटक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूगर्भातून येणार्या आवाजामुळे ग्रामस्थ झाले भयभीत.. आवरगाव आणि लाडझरी या गावकऱ्यांनी रात्र काढली जागून..
मागच्या दोन आठवड्यापासून बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूगर्भातून येणाऱ्या आवाजाचा प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे या आवाजामुळे लोक भयभीत होत आहेत विशेषतः रात्री होणाऱ्या आवाजामुळे ग्रामस्थ अक्षरश: रात्र जागून काढत आहेत..
धारूर तालुक्यातील सावरगाव मध्ये त्यानंतर परळी तालुक्यातील नागझरी येथे भूगर्भातून मोठ्या आवाज ऐकायला मिळत आहेत त्यामुळे नागरिक भयभीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे..मात्र हे डेक्कन ट्रॅप बेसाल्ट आवाज असल्याचे भूजल तज्ञ सांगत आहेत..
भूस्तरातील पोकळीमध्ये पावसानंतर भूजल व हवेची पोकळी यामधील परस्परक्रिया घडून येत असल्याने त्यावेळी आवाज ऐकायला येतात असं भूजल तज्ञांनी सांगितले आहेत
पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत स्वर्णीम विजय दिन सोहळा, विधानभवन परिसरात कार्यक्रमाचे आयोजन,
- कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त उपस्थित,
- थोड्याच वेळात अजित पवार कार्यक्रमस्थळी येणार,
औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने पोटच्या मुलाला पित्याने पंचगंगा नदीत फेकून दिलं
कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर मधील धक्कादायक घटना
अफान मुल्ला असं 5 वर्षीय मुलाचे नाव.
अफानला पंचगंगा नदीत फेकून दिल्याची निदर्यी बाप सिकंदर मुल्लाची कबुली
5 वर्षीय अफानचा पंचगंगा नदीत शोध सुरू..
औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने पोटच्या मुलाला पित्याने पंचगंगा नदीत फेकून दिलं, कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर मधील धक्कादायक घटना
अफान मुल्ला असं 5 वर्षीय मुलाचे नाव.
अफानला पंचगंगा नदीत फेकून दिल्याची निदर्यी बाप सिकंदर मुल्लाची कबुली
5 वर्षीय अफानचा पंचगंगा नदीत शोध सुरू..
बुलडाण्यात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनाची धडक. दोघांचा जागीच मृत्यू , एक जण गंभीर जखमी.
- अमोल गाढे व दीपक कायस्थ अशी मृतकांची नावं.
- कमलेश जाणारे हा गंभीर जखमी.
- जखमींवर बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.
- मोताळा जवळील दिघोळा फाटा येथे घडली घटना.
कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार
5 ऑक्टोबर रोजी हे पथक कोल्हापुरात येण्याची शक्यता
केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आठ सदस्यांचा पथकात समावेश
तब्बल 3 महिन्यांनंतर केंद्रीय पथक येणार असल्याने नेमकी कशाची पाहणी करणार असा सवाल
उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजापूर (Tuljapur) मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत. शारदीय नवरात्रोत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत, सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत. याबाबतचा जिल्हाधिकारी यांचा आदेश माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं कळविला आहे.
पार्श्वभूमी
तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर; देवीच्या दर्शनासाठी जाताय? 'हे' नक्की वाचा
उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजापूर (Tuljapur) मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत. शारदीय नवरात्रोत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.
भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत, सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत. याबाबतचा जिल्हाधिकारी यांचा आदेश माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं कळविला आहे.
परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे.
गर्दी होऊ नये आणि कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दररोज पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत फक्त 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यात 15 हजार भाविकांची प्रवेश मर्यादा घातल्याने आगामी काळात गर्दीवर नियंत्रण आणणे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असणार आहे.
2009 मध्ये मिरजेत घडलेल्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं (Sangli District Sessions Court) हा निकाल दिला आहे. 2009 मध्ये घडलेल्या मिरजमधील जातीय दंगलीनंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय गणितं मोठ्या प्रमाणावर बदललेली दिसतात. या दंगलीचा त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील परिणाम झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेना जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, शहर प्रमुख विकास सुर्यवंशी यांच्यासह 106 जणांची यामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मिरज शहरामध्ये 2009 दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगली घडली होती. ज्यानंतर या दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीतही उमटले होते. सध्याच्या आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आल्यानं न्यायालयानं हा खटला निकाली काढत, निर्दोष मुक्तता केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -