Breaking News LIVE : बेळगाव जिल्ह्यात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Breaking News LIVE Updates, 18 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 May 2021 10:20 PM
इंदापूर उजनीच्या ५ टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द

इंदापूर उजनीच्या ५ टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द, सांगोला शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार तर आमदार संजय शिंदे यांनी मानले अजित पवार यांचे आभार

इंदापूरला उजनीचे 5 टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द

इंदापूरला उजनीचे 5 टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय रद्द. सांगोला शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार तर आमदार संजय शिंदे यांनी मानले अजित पवार यांचे आभार.

पिंपरी चिंचवडमध्ये उद्यापासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होणार

पिंपरी चिंचवडमध्ये उद्यापासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 ते 122 दिवसांनी देण्याच्या सूचना आली आहे. त्यामुळे उद्या 45 वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीचा केवळ पहिला डोस मिळेल. तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस मिळेल. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस हा पहिला डोस घेऊन 28 दिवस पूर्ण झालेल्यांना दिला जाईल.

'कोवॅक्सिन' लसीच्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला डीसीजीआयची  मान्यता

'कोवॅक्सिन' लसीच्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला  ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (डीसीजीआय)  मान्यता, येत्या 10-12 दिवसांत क्लिनिकल ट्रायल सुरू होईल,  निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांची माहिती

सोलापूर : अंत्ययात्रेतील गर्दीत सहभागी झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 50 आरोपींना जामीन

सोलापूर : अंत्ययात्रेतील गर्दीत सहभागी झाल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 50 आरोपींना जामीन, सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या 200 पैकी 50 जणांना पोलीस केली होती अटक, शासकीय कामात अढथळा आणणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आदी कलम खाली दाखल करण्यात आला होता गुन्हा, मात्र केवळ एका दिवसात प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर 50 आरोपींना जामीन

रासायनिक खतांची दरवाढ ही भारतीय शेती उद्धवस्त करणारी आहे, राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

रासायनिक खतांची दरवाढ ही भारतीय शेती उद्धवस्त करणारी आहे, राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया, शेतकऱ्यांच्या पोरांनो याला विरोध केल्याशिवाय पर्याय नाही,  #stopfertilizerhike वापरून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन, 20 मे रोजी केंद्र सरकारच्या प्रतिमेचे आपापल्या शेतात दहन करा, राजू शेट्टी यांचं आवाहन

औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार घेणाऱ्या 16 रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार घेणाऱ्या 16 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 7 रुग्णांवर उपचार सूरु आहेत. 171 रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या 16 रुग्णांपैकी 4 हे औरंगाबाद शहरातील रुग्ण असून इतर हे ग्रामीण आणि इतर जिल्ह्यातून औरंगाबाद शहरात उपचार घेण्यासाठी आले होते. 7 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर  नीता पाडळकर यांनी दिली.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर CBI चा छापा

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर CBI चा छापा

खतांच्या वाढत्या किमती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांचे रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र

खतांच्या वाढत्या किमती संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांचे रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पत्र. या प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याची आणि किमतीतील वाढ लवकर मागे घेण्याची विनंती.

कोल्हापुरात शाहूपुरी पाच बंगला परिसरातील श्री सिद्धी गणेश मंदिरात चोरी

शाहूपुरी पाच बंगला परिसरातील श्री सिद्धी गणेश मंदिरात चोरी चोरट्यांनी गणेश मूर्तीचे चांदीचे कान,  चांदीचा पाळणा आणि दान पेटीवर मारला डल्ला. तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

तोक्ते चक्रीवादळानं पालटलं महाबळेश्वरचं रुप, परिसरात धुक्याची चादर

राज्यातील अतिशय लोकप्रिय अशा महाबळेश्वर गिरीस्थानाचं रुपडं या तोक्ते चक्रीवादळानं जणू पालटलं आहे. महाबळेश्वर येथे असणाऱ्या अनेक नयनरम्य ठिकाणांवरुन दऱ्याखोऱ्यांना पाहणं जणू परवणीच ठरत आहे. आर्थर सिटपासून इतर सर्वच पॉईंटला पोहोचलं असता तेथून डोंगररांगा, त्यांतून घोंगावणारा वारा कणखर महाराष्ट्राचं एक अनोखं रुप आपल्याला दाखतवत आहेत. 

Coronavirus India Cases : देशात नव्या आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूदरात वाढ

देशातील आजची कोरोना स्थिती : 


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 52 लाख 28 हजार 996
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 15 लाख 96 हजार 512
एकूण सक्रिय रुग्ण : 33 लाख 53 हजार 765
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 78 हजार 719
आतापर्यंत झालेलं एकूण लसीकरण : 18 कोटी 44 लाख 53 हजार 149

Coronavirus India Cases :  देशातील रुग्णसंख्येचा वाढता आलेख उतरणीला, गेल्या 24 तासांत 2 लाख 63 हजार 533 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus India Cases : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 63 हजार 533 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, काल देशात 4329 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे. तर चार लाख 22 हजार 436 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, देशात 19 एप्रिल 2021 नंतर पहिल्यांदाच एवढ्या कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 19 एप्रिल 2021 रोजी देशात दोन लाख 59 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

अकोला  : शहरात आज 9 पैकी 5 केंद्रांवर लसीकरण सुरु, दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक

अकोला  : शहरात आज 9 पैकी 5 केंद्रांवर लसीकरण सुरु असून शहरातील चार केंद्र आज बंद आहेत. आज शहरातील केंद्रांवर फक्त कोविशिल्डचा साठा उपलब्ध आहे. तसेच आज आणि उद्या दिवसभर पुरेल एवढाच लसींचा साठा उपलब्ध आहे. नवीन लससाठा बुधवारी किंवा गुरूवारी मिळणं अपेक्षित असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे. 

भिवंडी : केवळ दोन ठिकाणी लसीकरण सुरु, तर 2 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक

भिवंडी : केवळ दोन ठिकाणी लसीकरण सुरू आहे. तर 2 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे. 





 

वाशिम जिल्ह्यात 137  लसीकरण केंद्रांपैकी  34 केंद्र सुरु

वाशिम : वाशिम जिल्ह्यात 137  लसीकरण केंद्रांपैकी  34 केंद्र सुरु तर 1700 से लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यापैकी 1100 कोविशील्ड तर 600 कोवॅक्सीनचे डोस आहेत. 

नंदुरबार जिल्ह्यात 52 केंद्रावर लसीकरण सुरु, जिल्ह्यात 8 दिवस पुरेल इतका लसींचासाठा शिल्लक

नंदुरबार जिल्ह्यात 52 केंद्रावर लसीकरण सुरु आहे. त्याचसोबत आज 50 गावात लसीकरण कॅम्प भरवण्याच आले आहेत. जिल्ह्यात 8 दिवस पुरेल इतका लसींचासाठा शिल्लक आहे. चार दिवसात अजून साठा उपलब्ध होणार आहे

गोंदिया शहरात 140 केंद्रावर लसीकरण सुरु; शहरात 5 दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध

गोंदिया शहरात 140 केंद्रावर लसीकरण सुरु आहेत. शहरात 5 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. 4 दिवसात नवीन साठा मिळणं अपेक्षित आहे.

नांदेड : जिल्ह्यात 91 केंद्रावर लसीकरण सुरु, दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक

नांदेड : जिल्ह्यात 91 केंद्रावर लसीकरण सुरु आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रास प्रत्येकी 50 डोस तर शहरी लसीकरण केंद्रास 100 डोसचा दररोज पुरवठा.  दोन दिवस पुरेल एवढीच लस शिल्लक आहे. पुढील दोन  दिवसात अजून साठा उपलब्ध होणार असल्याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांची माहिती.

वर्धा जिल्ह्यात एकूण 38 केंद्रांवर लसीकरण केंद्र सुरू

वर्धा जिल्ह्यात एकूण 38 केंद्रांवर लसीकरण केंद्र सुरू आहे. जिल्ह्यात 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक आहे. नवीन साठा 2 दिवसांत अपेक्षित आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोना लसीचा दुसरा डोस 45 वर्षावरील नागरिकांसाठीच, जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रावर प्रत्येकी फक्त 100 डोसचा पुरवठा

नांदेड जिल्ह्यातील लसीकरणाच्या दुसऱ्या डोसबाबत 45 वर्षावरील नागरिकांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांनाच लस देण्याचा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने ज्येष्ठांना प्राधान्य देत लसीकरणाची ही मोहिम भविष्यातील डोसची उपलब्धता लक्षात घेऊन गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत आहे.

बुलढाणा : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांचा बुडून मृत्यू

बुलढाणा : जिल्ह्यातील धानोरा महासिद्धजवळ असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी 4 च्या सुमारास पोहायला गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झाला. रात्री घरी न आल्याने शोधाशोध सुरु केली असता घटना आज उघडकीस आली. तेजस गाडगे, विनायक गाडगे, नामदेव वानखडे अशी मृतांची नावं आहेत. 

अकोला : पाच लसीकरण केंद्रावर फक्त कोविशिल्ड लसींचं लसीकरण सुरु, इतर चार केंद्रं बंद

अकोला : शहरात एकूण 9 शासकीय लसीकरण केंद्र आहेत. यातील पाच लसीकरण केंद्रावरच आज फक्त कोविशिल्ड लसींचं लसीकरण सुरु आहे. इतर चार केंद्र बंद आहेत. जिल्ह्यात एकूण 153 लसीकरण केंद्र आहेत. जिल्ह्यात सध्या कोवॅक्सिन लसींचा साठा उपलब्ध नाहीये.

आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याची पिंपरीत चर्चा

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी गोळीबाराचा बनाव केला असेल तर आमदारांवर गुन्हा दाखल करणार का? पत्रकारांच्या या प्रश्नाला आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी बगल दिली. यानिमित्ताने कृष्ण प्रकाश यांचा नेहमीचा आक्रमकपणा, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची भाषा गायब झाली.

धुळे जिल्ह्यात शिल्लक असलेल्या साठ्यातून लसीकरण सुरु

धुळे जिल्ह्यात लसीकरणासाठी नवीन डोस उपलब्ध झालेले नसल्याने आज लसीकरण होणार नसून, सध्या शिल्लक असलेल्या साठ्यातून काही ठिकाणी लसीकरण होणार आहे. धुळे जिल्ह्याला 5 हजार 429 कोविशिल्ड लसी मंजूर झाल्या असून त्या गुरुवारपर्यंत उपलब्ध होणार आहेत. कोवॅक्सिन लसीच्या उपलब्ध साठ्यानुसार महापालिकेने आता कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार बुधवारपासून लसीकरण होणार आहे.

लातूर जिल्ह्यातील एकूण 171 केंद्रापैकी फक्त 6 केंद्रावर लसीकरण सुरू

लातूर जिल्हा आरोग्य विभागाने चार लाख पन्नास हजार डोसची मागणी शासनकडे केली होती. मात्र मागील चार दिवसांपासून लसीचा पुरवठा अनियमित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 171 केंद्रावर लसीचा प्रचंड तुटवडा आहे. याच कारणामुळे फक्त सहा केंद्रावर सध्या लसीकरण सुरू आहे

बारामती शहरात लसींचा तुटवडा, लसीकरण मोहिम ठप्प

बारामती शहरात एकूण 36 लसीकरण केंद्र असून आज एकही केंद्र सूरू नाही आहे. बारामतीत लसीअभावी लसीकरण बंद असल्याचा आजचा पाचवा दिवस आहे. दररोज सुमारे साडे चार ते पाच हजार नागरिकांना लस दिली जाते.

कोरोना लसींसाठी मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला कंपन्यांकडून अद्याप प्रतिसाद नाही

मुंबई महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसींसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला अद्याप एकाही कंपनीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. आज रात्रीपर्यंत कोणत्या कंपन्या निविदा भरणार याकडे महापालिकेचं लक्ष आहे. दरम्यान बीएमसीकडून लसींच्या ग्लोबल टेंडरला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

लातूर : थकीत वेतनासाठी पन्नगेश्वर साखर कारखान्यास कर्मचाऱ्यांनी लावले कुलूप

लातूर : एप्रिल 2019 ते एप्रिल 2021 या दोन वर्षापासून पन्नगेश्वर साखर कारखान्यातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचा पगार थकीत आहे. थकीत वेतनासाठी पन्नगेश्वर साखर कारखान्यास कर्मचाऱ्यांनी थेट कुलूप लावले आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या उभारणी वेळी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या. त्या बदल्यात जमीन धारकांना कारखान्याने सेवेत सामावून घेतलं आहे. मागील दोन वर्षांच्या काळात या कर्मचाऱ्यांच्या पगार झाल्या नसल्याने कर्मचारी आर्थिक डबघाईला आले आहेत. आमच्या पगार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टाळे उघडणार नाही अशी भूमिका आता कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

सोलापूरच्या ग्रामीण भागात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन, 21 मे सकाळी 7 ते 1 जून सकाळी 7 पर्यंत कडक निर्बंध

सोलापूरच्या ग्रामीण भागात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनदरम्यान मेडिकल, कृषी विषयक साहित्याची दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहे.  सोलापूर शहर हद्द वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्बंध लागू होणार आहेत. 21 मे सकाळी 7 ते 1 जून सकाळी 7 पर्यंत ग्रामीण भागात कडक निर्बंध असतील. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. किराणा दुकान, भाजी मंडई, कृषी उत्पन्न बाजार समिती, इतर सर्व व्यवसाय 10 दिवसांसाठी पूर्णतः बंद असतील. मात्र किराणा माल, भाजीपाला, पाळीव प्राण्यांचे खाद्यपदार्थ सकाळी 7 ते 11 वेळेत घरपोच सेवा देण्यास मुभा असेल.

नागपुरात अंमली पदार्थांची विक्री आणि साठा करणाऱ्यांना 20 जणांना अटक, 21 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

नागपूर पोलिसांनी सोमवारी (17 मे) रात्री शहरातील विविध पोलिस स्टेशन अंतर्गत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आणि त्यांचा साठा करणाऱ्या 20 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 21 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या अंमली पदार्थांमध्ये एमडी, चरस आणि गांजा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एबीपी माझाने नागपुरातील पाचपावली परिसरात झालेल्या तीन हत्यांमागे तरुण गुन्हेगारांना लागलेली अंमली पदार्थांची सवय कारणीभूत असल्याचे समोर आणले होते.

अमरावती जिल्ह्यात पुन्हा लसींचा तुटवडा.

अमरावतीत दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद. अमरावती महानगरपालिकेच्या केंद्रावर तूर्तास लस उपलब्ध राहणार नाही. लस उपलब्ध झाल्यावर त्याबाबत कळविण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील आमलान गावाजवळ प्रवासी वाहतूक करणारी बस गावकऱ्यांनी रोखली

नंदुरबार : लॉकडाऊन काळात अंतर राज्य प्रवासी वाहतूकीसाठी अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. सीमा तपासणी नाक्यावर  rt-pcr चेक होत असल्यानं गुजरातमधून खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनं ग्रामीण भागातील मार्गाचा वापर करत आहेत. रात्री नवापूर तालुक्यातील आमलान गावाजवळ प्रवासी वाहतूक करणारी बस गावकऱ्यांनी रोखल्या. पोलिसांनी घटनस्थळी जात बस परत गुजरात राज्यात पाठविल्या आहेत.

अमरावतीत पुन्हा लसींचा तुटवडा, दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद

अमरावती : अमरावती जिल्ह्यात पुन्हा लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या केंद्रावर तूर्तास लस उपलब्ध राहणार नाही. लस उपलब्ध झाल्यावर त्याबाबत कळविण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच दिवसांनंतर बाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. सोमवारी तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं

तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. भारतीय हवामान विभागाने ट्वीटद्वारे ही माहिती दिली. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात अजूनही अनेक ठिकाणी वारा आणि पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसत आहे.

पार्श्वभूमी

तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं 
तोक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. भारतीय हवामान विभागाने ट्वीटद्वारे ही माहिती दिली. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात अजूनही अनेक ठिकाणी वारा आणि पाऊस सुरु आहे. मुंबईसह उपनगरात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसत आहे.


तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, मदतकार्य वेगाने सुरु ठेवण्याचे आदेश
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने आज मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत थैमान घातले. यात झालेल्या नुकसानीचा आणि निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 


या वादळामुळे एकूण 6 मृत्यू झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. एकूण 12 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. 


चांगली बातमी! राज्यात आज नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर तब्बल 48 हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच दिवसांनंतर बाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. आज तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर आज नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज 516 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.