Breaking News LIVE : तोक्ते चक्रीवादळामुळे उद्या संपूर्ण मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार
Breaking News LIVE Updates, 16 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरीत दाखल, राहत्या घरी ठेवण्यात येणार त्यांचं पार्थिव
मी काल जे केलं ते निंदनीय आहे, पण गरजेचं होतं. चुकीचे काही केले नाही, कुणाला चुकीचे वाटत असेल तर परिणामांना समोर जायला तयार आहे. नाशिकमध्ये रुग्णालयात राडा घालणाऱ्या राजेंद्र ताजणे यांची प्रतिक्रिया. रुग्णांना चांगली वागणूक दिली जात नाही. रेमडेसिवीरचा काळाबाजार केला जातोय.
तोक्ते चक्रीवादळामुळे उद्या संपूर्ण मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद राहणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती
मुंबईत आज 1544 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2438 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत 6,36,753 रुग्णांची कोरोनावर मात, सध्या 35,702 रुग्णांवर उपचार सुरु
मुंबईत आज 1544 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 2438 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत 6,36,753 रुग्णांची कोरोनावर मात, सध्या 35,702 रुग्णांवर उपचार सुरु
पिंपरी चिंचवडमध्ये उद्या लसीकरण होणार नाही. लसीचा साठा संपला असून, नव्यानं साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने उद्या लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या जवळपास 200 जणांवर गुन्हे दाखल, अंत्यविधीसाठी पुढाकार घेतलेल्या 20 लोकांची नावे निष्पन्न, त्यांच्यासहित 200 लोकांवर गुन्हे, शासकीय कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल, सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांची माहिती
भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस कोरोनाच्या भारत आणि ब्रिटनमध्ये सापडणाऱ्या नव्या स्ट्रेनवर प्रभावशाली
पुण्याच्या खेड तालुक्यात चक्रीवादळाचा अनेकांना फटका बसलाय. भोरगिरी आणि भिवेगावमधील तब्बल 70 घरांचे, तीन शाळांचे आणि एक ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे. काहींचे पत्रे उडाले तर काहींच्या भिंती कोसळल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू झालंय.
नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. सुमारे एक तास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली. नंदुरबार शहरासह तालुक्यात, नवापुर परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहरी भागातील अनेक दुकानांचे पत्रे उडाले तर शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान शक्यता आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासून ढगाळ वातावरण देखील होतं. अनेक शेतकऱ्यांनी बाहेर टाकलेली कांदे आणि अन्य पीक हे वाचवण्यात आले आहे तर दुसरीकडे गेल्या महिन्याभरापासून कडाक्याचं ऊन असल्यामुळे शहरी भागातील नागरिकांना तूर्तास उकाळ्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
मनमाड शहरात आणि परिसरात जोरदार पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे कांद्याला फटका बसण्याची शक्यता
जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका, केंद्र सरकारने निवडणुका संपताच महागाई सुरू केली, पेट्रोल-डिझेलचे दर आज गगनाला भिडलेत, खतांच्या किमती वाढल्याने आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी हवालदिल झालाय, या दरवाढीचा आम्ही निषेध करतो, याविरोधात आम्ही राज्यभरात ठिकठीकाणी आंदोलन करणार
हिंगोली : काँग्रेस नेते तथा खासदार राजीव सातव यांच्या निधनाने त्यांचे गाव मसोडवर शोककळा पसरलीय. राजीव सातव यांनी आपला राजकीय प्रवास हा मसोड पंचायत समिती ते थेट संसदेपर्यंत केला. गावात प्राथमीक आरोग्य केंद्रापासून ते पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत सर्व सुविधा त्यांनी स्वतः लक्ष देऊन आणल्या होत्या. त्यामुळे त्यांचे गाव हे आदर्श गाव म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने आमचे गाव पोरके झाल्याच्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
Rajiv Satav Passes Away : राजीव सातव यांच्या जाण्यानं केवळ राज्याचंच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालीय. कधीही हार मानायची नाही असा त्यांचा स्वभाव होता. संपूर्ण देशात मोदी लाट असताना गुजरातमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली होती. सध्याच्या काळात कांग्रेस पक्षाला त्यांची फार गरज होती, असं म्हणत राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बेळगाव : जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देगाव गावाला जाण्यासाठी रस्ता देखील नाही. गावात चाळीस कुटुंबे असून लोकसंख्या दोनशे आहे. गावात एकही किराणा मालाचे, धान्याचे दुकान नाही. साधे मीठ विकत घ्यायचे असेल तरी त्या गावातील लोकांना तालुक्याच्या गावी म्हणजे खानापूरला जावे लागते. त्यात सध्याच्या लॉकडाऊनमुळे रोजगार नाही आणि हातात पैसा नाही अशी स्थिती उद्भवली होती. खानापूर तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने ही माहिती नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांना दिली. डॉ. सोनाली यांनी रेशन किट आणि औषधे घेवून देगाव गाठले. गावातील चाळीस कुटुंबांना त्यांनी रेशन किट आणि औषधांचे वितरण केले. रेशन किट वितरण प्रसंगी डॉ. सोनाली यांनी ग्रामस्थांना सध्या कोरोना संक्रमण काळात घ्यायच्या काळजी विषयी मार्गदर्शन केले.
'सकाळी सकाळीच राजीव सातव यांच्या निधनाची आलेली बातमी दुःखद आहे. आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास त्यांनी अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. सातव यांचे निधन हि काँग्रेसची मोठी हानी आहे. सातव परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत', असं म्हणत राजीव सातव यांना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपण राजीव सातव यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आलं असतानाच त्यांच्या निधनाचं वृत्त मिळालं आणि धक्का बसला अशी प्रतिक्रिया दिली. मनाला चटका देणारी ही घटना अतिशय वेदनादायी आहे असं म्हणत सातव कुटुंबीयांप्रती त्यांनी आधार देणारी भावना व्यक्त केली. युवकांचं नेतृत्त्व करणारा नेता आणि राज्याच्या राजकीय वर्तुळाच अपेक्षांचं ओझं असणारा नेता अशी राजीव सातव यांची ओळख यावेळी राजेश टोपे यांनी अधोरेखित केली. राजीव सातव यांच्याप्रमाणंच तरुण फळीतील नेता म्हणून ओळख असणाऱ्या विश्वजीत कदम यांनीही सातव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं.
शरद पवार यांच्या हस्ते कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी म्हाडाच्या घरांचं वाटप , म्हाडाकडून 100 घरं टाटा रुग्णालयांसाठी हस्तांतरित करण्यात आली, गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या उपस्थिती पार पडला कार्यक्रम
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. 'गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे', असं त्यांनी या श्रद्धांजलीपर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं.
बुलढाणा : किणगाव राजा येथे पोलिसांच्या वाहनाला अपघात, 20 फूट खोल खड्ड्यात वाहन कोसळून अपघात, पोलीस निरीक्षकासह तीन कर्मचारी जखमी, जखमींवर सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू, धावत्या वाहनाच स्टेअरिंग जाम झाल्याने अपघात घडल्याची माहिती
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं कोरोनामुळे निधन, पुण्यातील जहांगीर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची माहिती
मुळचे अमरावती शहरातील रहिवासी आणि सध्या स्कॉटलॅड येथे वैद्यकीय सेवा देत असलेले डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी नुकतीच स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. स्कॉटिश संसदेत निवडुन जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांच्या यशाने राज्यासह अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढचे आठ दिवस कडक लॉकडाऊन. वैद्यकीय कामाव्यतिरिक्त बाहेर पडल्यास थेट पोलीस ठाण्यात रवानगी. कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांच्या सूचना. नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करून कोर्टासमोर हजर करणार, कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
वांद्रे येथील बँड स्टॅन्ड परिसरात एका महिलेवर बलात्काराची घटना समोर आली आहे. पीडित महिला आपल्या प्रियकरासोबत बँड स्टॅन्ड गेली होती, त्या नंतर प्रियकराचे दोन मित्रही तेथे पोहोचले, या तिघांनी पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरुवातीला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता मात्र नंतर वांद्रे पोलीसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सदर आरोपींवर अटक सामुहिक बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत.
लॉकडाऊनमुळे भारतांसह जगभरात कोरोना काळात नवजात बाळाची संख्या वाढेल म्हणजे जगाचा जन्मदर वाढेल असा अंदाज होता. पण उलटे झाले आहे. 21 देशांनी प्रकाशित केलेली जानेवारी 2021 ची माहिती सांगते जानेवारी 2020 च्या तुलनेत सरासरी एक हजार जन्मापैकी 11 टक्के कमी जन्म झाले आहेत. 2000 ते 2009 ची आकडेवारी पाहिली तर अपेक्षेपेक्षा हा जन्मदर 12 टक्के कमी आहे. गरीब देशांचा माहिती अद्याप उपलब्ध नाही, जिथे जन्मदर अधिक आहे.
पार्श्वभूमी
Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
"अरबी समुद्रात निर्माण झालेले तोक्ते (Cyclone Tauktae) चक्रिवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात 16 मे रोजी दाखल होत आहे. रविवारी पहाटे 4 वाजता जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणारे हे वादळ दुपारी 2 वाजता जिल्ह्याची सीमा ओलांडून पुढे जाणार आहे. त्यामुळे पहाटे 4 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये नागरिकांनी अधिक दक्ष रहावे." असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी देले आहे.
अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या तोक्ते (Cyclone Tauktae) या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तवली आहे. तसेच 15 मे रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर ताशी 50 ते 70 कि.मी. वेगाने तर 16 मे रोजी ताशी 60 ते 80 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच समुद्र खवळलेला राहणार आहे. या कालावधीत मच्छिमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ दिनांक 16 मे रोजी अंदाजे पहाटे 4 वाजता गोव्याची सीमा ओलांडून सिंधुदुर्गच्या समुद्रात येणार असून दुपारी 2 च्या दरम्यान सिंधुदुर्गची सीमा ओलांडून पुढे जाईल. त्यामुळे 16 मे रोजी पहाटे 4 ते दुपारी 2 पर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Monsoon : तोक्ते चक्रीवादळाचा मान्सूनला असाही फायदा
दरवर्षी १ जून रोजी हजेरी लावणारा मान्सून यावर्षी एक दिवस आधीच केरळात दाखल होणार आहे. मान्सून यावर्षी सरासरी १०३टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, स्कायमेटने देखील ३० मे रोजीच मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं म्हटलंय. प्रतीवर्षी सरासरी प्रमाणे १ जून रोजी मान्सून केरळात हजेरी लावत असतो. मात्र, यावर्षी एक दिवस आधीच तो दाखलहोण्याची शक्यता आहे. मात्र यंदा तोक्ते चक्रीवादळामुळे तो आधीच दाखल होण्यचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामानविभागानं यंदा 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
COVID-19 Vaccination: देशात लसीकरणाचा आलेख पडला; कोरोनाला कसं रोखणार?
कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशात थैमान घातलं आहे. लसीकरण करणे हे कोरोनाविरोधात सर्वात मोठं शस्त्र मानले जाते. मात्र, सद्य परिस्थिती पाहता देशात लसीकरणाचा वेग समाधानकारक नाही. बर्याच राज्यात लसींची तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेच लसीकरणाचा आलेख एकदम खाली आला आहे. परिणामी कोरोनाची साखळी कशी तुटेल असे प्रश्न उपस्थित होत आहे.
शुक्रवारी संपूर्ण देशात केवळ 11 लाख 3 हजार लसींचे डोस देण्यात आले. त्यापैकी 6 लाख 29 हजार लोकांना पहिला डोस देण्यात आला, तर 4 लाख 74 हजार लोकांना दुसरा डोस देण्यात आला. हा वेग खूप कमी आहे. यापूर्वी गुरुवारी 23 लाख, बुधवारी 21 लाख, मंगळवारी 27 लाख डोस देण्यात आले होते. आतापर्यंत देशात एकूण 18 कोटी डोस देण्यात आले आहेत. यापैकी 13.93 दशलक्ष लोकांना पहिला डोस देण्यात आला.
कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचं आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावं : अशोक चव्हाण
राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. यावरुन आता काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप शासित राज्यात परिस्थिती दयनीय झाली असताना फडणवीस मात्र महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचे काम करत असल्याची गंभीर टीका चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -