Breaking News LIVE : आज राज्यात 14,433 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी, 12,557 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

Breaking News LIVE Updates, 6 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2021 08:00 PM
गली : आटपाडी तालुक्यातील घानंद गावामध्ये साखळी बंधाऱ्यातून तीन मुलं वाहून गेली

Breaking News LIVE : सांगली : आटपाडी तालुक्यातील घानंद गावामध्ये साखळी बंधाऱ्यातून तीन मुलं वाहून गेली, एकाच घरातील 15 ते 18 वयोगटातील मुलं,  स्थानिकांच्या मदतीने तपासकार्य सुरू
https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-june-6-2021-maharashtra-political-news-coronavirus-lockdown-news-989581

आज राज्यात 14,433 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी, 12,557 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 233 जणांचा मृत्यू

आज राज्यात 14,433 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी,  12,557 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर  233 जणांचा मृत्यू 

मान्सून आज पुण्यात दाखल होणार; भारतीय हवामान विभागाची माहिती 

मान्सून आज 6 जूनला पुण्यात दाखल होणार, राज्यात मान्सून अलीबाग- रायगड, पुणे आणि मराठवाडा मधील काही भागापर्यंत  पोहोचला. भारतीय हवामान विभागाची माहिती 

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

प्रकृती खालावल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल 

मराठा समाजावर अन्याय होत आहे - खासदार संभाजीराजे छत्रपती

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरून मांडली. मराठा समाजावर अन्याय होत असल्याचं म्हणत कोण चूक कोण बरोबर याच्याशी आम्हाला घेणंदेणं नसून आता मराठा समाजाचा आरक्षण द्या अशीच मागणी त्यांनी उचलून धरली 

कोणालाही दिशाहिन करणं आमच्या रक्तात नाही- खासदार संभाजीराजे छत्रपती

कोणालाही दिशाहिन करणं आमच्या रक्तात नाही, दिशा दाखवणं हे आमचं काम, असं म्हणत आज सगळ्या समाजांना आरक्षण आहे पण मराठा समाजाला मात्र आरक्षण नाही असा तीव्र नाराजीचा सूर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आळवला. सध्याच्या आणि मागच्या सरकारमध्ये विनाकारण भांडणं सुरु आहेत असंही ते अगदी स्पष्टपणे म्हणाले. 

शिवाजी महाराज छत्रपती का झाले, याचं चिंतन करणं गरजेचं- खासदार संभाजीराजे छत्रपती

शिवाजी महाराज छत्रपती का झाले, याचं चिंतन करणं गरजेचं, असं म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याला संबोधित केलं. बारा बलुतेदार, अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट होतं असं ते शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान म्हणाले. 

शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर केवळ 20 लोकांना परवानगी

शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर केवळ 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे.शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाजीमहाराजांच्या राज सदर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. साधारणपणे दहा वाजता पूजेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर आपल्या आगामी भूमिकेबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती बोलणार आहेत. कोरोनाच्या सावटामुळे यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडणार आहे. 

सांगलीमधील शिराळ्यात वादळी वारे, पावसाचे थैमान; एमआयडीसीचे मोठे नुकसान

सांगली : शिराळा तालुक्यात काल सायंकाळी वादळी वारे आणि पावसानं थैमान घातले. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वाऱ्यामुळे मात्र शिराळा औद्योगिक वसाहतीतील 25 ते 35 कंपन्यांच्या छतावरील पत्रे उडून गेले. इमारतींचे मोठे नुकसान झाले. तर चार महिला कर्मचारी भिंत पडून जखमी झाल्या असून एका तरुणीचे दोन्ही पाय मोडल्याचे समोर आले आहे. जोरदार वाऱ्याने कंपन्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. त्या परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पडला. ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. वादळामुळे अनेक कंपन्यांच्या छतावरील पत्रे उडाल्यामुळे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे शिराळा परिसरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे वाहतूक बंद झाली होती. वीजपुरवठाही खंडित झाला.

नैऋत्य मॉन्सून पुढील 24 तासांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता

नैऋत्य मॉन्सून मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटकातील उर्वरित भाग, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूचा उर्वरित भाग, मध्य भाग येथे आणि पुढील 24 तासांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे.

दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ
बीड : जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखीव ठेवत दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली असून, या मोहिमेचा परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 

 

दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ये-जा करणे, यासह अन्य अडचणींचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केला होत्या. त्यानुसार एक दिवस फक्त दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणा साठी राखीव ठेऊन प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्याच्या या विशेष मोहिमेची बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याचा आपला मानस आहे, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले

पार्श्वभूमी

सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्बंधांबाबत ठरवणार : राज्य सरकार


मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरता असताना राज्य सरकारने आता ब्रेक दि चेन अंतर्गत अनलॉकची प्रक्रियी सुरु केली आहे. मात्र, आज काढण्यात आलेले आदेश हे निर्बंध हटविण्यासाठी नसून निर्बंधांबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यासाठी असल्याचे सांगण्यात येतंय. या पातळ्यांच्या आधारे सबंधित स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेणार आहे. कुणीही गोंधळू नये व इतरांना गोंधळवू नये असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. 
  
कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नसल्याने वेगवेगळ्या 5 पातळ्या ठरवण्यात आल्या आहेत. या लेव्हल्स ( पातळ्या) निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेडसची दैनदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येणार आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेणार आहेत. 


BMC Unlock Guideline : मुंबई महापालिकेची अनलॅाक नियमावली जारी, लोकल सर्वसामान्यासाठी बंदच


मुंबई : मुंबई महापालिकेने अनलॅाकची नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या गाईडलाईनद्वारे मुबंई लेवल तीनमध्ये आहेत. मुंबईचा आताचा पॉझिटिव्हिटी रेट 5.30 टक्के आहे. मात्र पुढच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुधारणा होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यासाठी इतर महापालिकांसोबत चर्चा करुन मुंबई महापालिका नवी नियमावलीही जारी करण्याची शक्यता आहे. 


मुंबई लोकल सुरु होणार की नाही याची सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. सध्या तरी लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहे. आधीच्या गाईडलाईनप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवेकरिताच लोकल प्रवासास परवानगी असणार आहे. 


Pune Unlock Guideline पुणे महापालिकेची अनलॅाक नियमावली जारी; दुकाने, हॉटेल चार वाजेपर्यंत खुली तर सलून, उद्याने, जीम उघडणार


पुणे :  राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने राज्यशासनच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहे. तर सलून, ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्याने पुन्हा उघडणार आहे. या सुधारित नियमांची अंमलबजावणी सोमवार( 7 जून) पासून करण्यात येणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.