Abhishek Sharma Breaks Yuvraj Singh Sixer Record : टीम इंडियासाठी अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली आणि फक्त 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. अभिषेकच्या (Abhishek Sharma) खेळीच्या जोरावर भारताने कोलकाता येथे इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अभिषेक शर्माने 232.35 च्या स्ट्राईक रेटने 34 चेंडूत 79 धावा केल्या. या खेळीत त्याने पाच चौकार आणि आठ षटकार मारले. 24 वर्षीय आक्रमक सलामीवीराने 20 चेंडूत अर्धशतक ठोकून अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यादरम्यान, त्याने त्याचा गुरू युवराज सिंगचा एक खास विक्रम मोडला आहे. तो इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे.
या सामन्यापूर्वी, भारतीय संघाकडून इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता, ज्याने 2007 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये डरबन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सर्वाधिक षटकार मारले होते. 2007 साल त्याच्या 58 धावांच्या खेळीत एकूण 7 षटकार आले होते. आता, अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्ध भारतासाठी टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनण्याचा त्याचा 18 वर्षांचा जुना विक्रम मागे टाकला आहे. आणि एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. त्याने एकूण 8 षटकारही मारले.
अभिषेक युवराजच्या विक्रमाची केली बरोबरी
तर दुसरीकडे या सामन्यात अभिषेक शर्मा अजून एक मोठी कामगिरी केली. तो भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज ठरला. त्याने फक्त 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने त्याचा गुरू युवराज सिंगची बरोबरी केली. या माजी अष्टपैलू खेळाडूने 2009 मध्ये मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध इतक्याच चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यानंतर 79 धावांच्या त्याच्या शानदार खेळीबद्दल बोलताना अभिषेक शर्मा म्हणाला की, खरं सांगायचे झाले तर, मला खेळण्याचा आनंद घ्याचा होता, ज्यासाठी कर्णधार आणि प्रशिक्षक दोघांनीही मला स्वातंत्र्य दिले होते. या विकेटवर दुहेरी उसळी होती आणि आमच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. मला वाटले होते की आम्हाला 160 ते 170 धावांचे लक्ष्य असेल पण गोलंदाजांनी खूपच चांगली कामगिरी केली.
हे ही वाचा -