Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल

Continues below advertisement

Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल 

 वाल्मिक कराड (Walmik Karad) याला काल रात्री पोटात दुखत असल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये वाल्मिक कराडवर उपचार सुरू आहेत. 

वाल्मिक कराडची सोनोग्राफी करण्यात आली, मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी देखील केली. काल रात्री (22 जानेवारी) पावणे बाराच्या दरम्यान वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहातून बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या बीडच्या सरकारी रुग्णालयात वाल्मिक कराड वर उपचार सुरू आहेत.आता इथून पुढे वाल्मिक कराडला जेलमध्येच रहावं लागणार आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील जामिनासाठी कोर्टात गेले तरी मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपी जामीन मिळत नाही. त्यामुळे किमान पुढचे सहा महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच रहावं लागणार आहे. कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सीआयडीला ज्या ज्या वेळी तपासासाठी वाल्मिक कराडची गरज असेल. त्यावेळी कोर्टाच्या परवानगीने सीआयडी कराडची चौकशी करु शकते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram