Breaking News LIVE : सीबीएसई बारावी परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यांकनाची नवी पद्धत दोन आठवड्यात स्पष्ट करा : सुप्रीम कोर्ट
Breaking News LIVE Updates, 3 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बदलापूर एमआयडीसी परीसरात केमिकल वायू गळती, आपटेवाडी, शिरगाव परिसरातील नागरिकांना खोकला, श्वास घेण्यास त्रास
सोलापूर महानगरपालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता,
त्यामुळे सोलापूर शहरसाठी दिलासा मिळण्याची शक्यता,
शहराचत काही प्रमाणात व्यापार-उद्योग निर्बंध होणार शिथिल,
काही वेळात पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचे आदेश येतील,
2011 ची जनगणना ही 10 लाख पेक्षा कमी असल्याने स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते पालिकेला,
त्यामुळे शहराची कोव्हिडं परिस्थिती आटोक्यात असताना देखील ग्रामीणचेच आदेश शहरात देखील होते लागू,
अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही, 5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता, अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
2 ते 9 जून दरम्यान म्युकरमायकोसीसचे उपचार केलेले,बरे झालेले आणि मरण पावलेले रुग्ण किती? किती इंजेक्शनचा दररोज पुरवठा झाला? जिल्हावार माहिती देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश, खंडपीठा अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांना आदेश
सीबीएसई बारावी परीक्षा रद्द केल्यानंतर मूल्यांकनाची नवी पद्धत दोन आठवड्यात स्पष्ट करा, सुप्रीम कोर्टाचे आजच्या सुनावणीत केंद्राला आदेश, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर होऊन दोन दिवस झाल्यानंतरही मूल्यांकनाबाबत अजून स्पष्टता नाही त्या पार्श्वभूमीवर आदेश, 15 जूनला या प्रकरणात पुढची सुनावणी, परीक्षा रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर ही खंडपीठाने व्यक्त केले समाधान
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी जस्टीस आनंद निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राचार्य बबनराव तायवाडे. अॅड. चंद्रलाल मेश्राम, अॅड. बालाजी किल्लीरिकर, संजीव सोनावणे, डॉ. गजानन खराटे, डॉ नीलिमा सराफ हे सदस्य आहेत.
Maharashtra Lockdown : लॉकडाऊन संदर्भात मोठा निर्णय! ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के त्या जिल्ह्यांना शिथिलता, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
पाच राज्यांसाठी काँग्रेसचे प्रभारी जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातले संजय दत्त हे आता हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून काम पाहणार
त्याआधी ते तमिळनाडूचे प्रभारी होते.
राज्यातील इयत्ता बारावीची परीक्षा रद्द, आजच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
भाजप ज्यांच्या जीवावर सत्तेत आहेत त्याच ओबीसी समाजाचा गळा कापण्याच काम आणि आरक्षण संपवण्याचं काम फडणवीस सरकारने केलं असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक दोन वर्षे साध्या एका पत्रकारावर थांबवण्याच काम फडणवीसांनी केल्यासं सांगत ते म्हणाले की, जर ती निवडणूक हरलो तर महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल असं त्यांना वाटत होतं. भाजपने संविधानाची पायमल्ली करण्याचं काम केलं आणि म्हणून ओबीसी समाज परिणाम भोगत आहे असंही ते म्हणाले.
दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका मागे घेण्यात आली आहे. पुण्यातील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केली होती. नव्याने याचिका दाखल करुन राज्य सरकारने जारी केलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आव्हान देण्यास मुभा मिळाली आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टल इन्व्हलपचे (लिफाफा) लोकार्पण मुंडेच्या पुण्यतिथीला म्हणजेच आज होत आहे. दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी, दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात होणार आहे.
देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.18 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 92 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन रुग्णसंख्या 7 टक्क्यांनी कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगभरात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येतही भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
ओबीसी आरक्षणाकरीता भाजपा ओबीसी मोर्च्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात भाजपचे हे आंदोलन असल्याचं आंदोलकांनी सांगितलं.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 34 हजार 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 2887 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 11 हजार 499 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज देशात सलग 21व्या दिवशी कोरोनाची लागण झालेल्यांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे त्या धर्तीवर स्वछतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छतेचे तिनतेरा वाजले आहे. रुग्णालयात अक्षरशः लसीकरण केंद्रापर्यंत डुकरांचा मुक्त संचार आहे. ज्या ठीकानी कोरोना लस दिल्या जात आहेत, तिथेच गटार असून तिथेच डुक्कर मुक्त संचार करीत रुग्नणाच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच रुग्णाच्या वार्ड मधील शौचाल्याचे सांड पानी चक्क रस्त्यावर वाहत असून त्याचे गटार साचले आहेत. इमारतीच्या सर्व पाईपलाईन फुटल्या आहेत. याकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील असंख्य रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारा वर तसेच म्युकर मायकोसिस चे रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर हे बिनधास्त संचार करताना दिसत आहेत.
हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमिटेड सोबत केंद्र सरकारने करार केला असून या कंपनीकडून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तीस कोटी डोस केंद्र घेणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारेन दीड हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम कंपनीला दिली आहे. सध्या ही लस तिसऱ्या फेजच्या ट्रायल मध्ये आहे
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे
नागपूर : जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील ब्रह्मपुरी गावामध्ये 109 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावामध्ये अनेकांना पोटदुखी, हगवण आणि उलटीचा त्रास होत होता. त्यानंतर आरोग्य पथकाने तपासणी केली असता बहुतांशी लोकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जास्त त्रास होत असलेल्या काही जणांना पाटणसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कळमेश्वरमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईप लाईनमध्ये घाण पाणी जात असल्यामुळे गॅस्ट्रो झाला असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने गावात टँकरने पाणीपुरवठा करणे सुरु केलं आहे.
सांगली : मिरज शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन प्लान्टला रात्री 9 च्या सुमारास गळती लागली. प्लान्टच्या मुख्य टाकी जवळील पाईपलाईन व्हॉल मधून ऑक्सिजन गळती होत होती. यावेळी शासकीय रुग्णालय प्रशासन जिल्हा अधिकारी डॉ अभिजित चौधरी, महापालिका प्रशासन, अग्निशमन विभाग यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी व्हॉल दुरुस्ती करणारी टीम येऊन त्यांनी तात्काळ दुरुस्ती केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मिरज शासकीय रुग्णालयात सद्या तीन ऑक्सिजन प्लान्ट आहेत. त्यामधील एका प्लान्टमध्ये ऑक्सिजन गळती झाली होती. किरकोळ ऑक्सिजन गळती झाल्याने ऑक्सिजन साठ्यावर काही परिणाम झाला नाही. ऑक्सिजन प्लान्ट तात्काळ दुरुस्ती झाली आहे. तसेच ऑक्सिजनची गळती देखील मोठ्या प्रमाणावर झालेली नाही अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलीय. या ऑक्सिजन प्लान्टची जबाबदारी असलेल्या कंपनीला ही बाब कळवली गेली असून कंपनीच्या टेक्निशनकडून या प्लांटची पाहणी केली जाणार आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Corona Cases : राज्यात काल तर 15,169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 29,270 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 285 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट आहे. राज्यात आज एकूण 2,16,016 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत एकूण 54,60,589 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.54% टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 285 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,55,14,594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,76,184 (16.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16,87,643 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,418 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 925 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 674296 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16580 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 477 दिवसांवर पोहोचला आहे.
Mehul Choksi Petition : मेहुल चोक्सीची याचिका रद्द करण्याची डोमिनिका सरकारची कोर्टाकडे मागणी
Mehul Choksi : 14 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर गेली काही वर्ष कॅरिबियन बेटांवरच्या अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सी वास्तव्याला होता. याच बेटावरील डोमिनिकामधून मेहुल चोकसीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सध्या मेहुल चोक्सी हा भारतातील प्रत्यार्पण रोखण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहे. आज कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान डोमनिका सरकारने चोक्सीची याचिका रद्द करण्याची मागणी केली आहे.
डोमनिका सरकारने याचिका रद्द करण्याची मागणी करत मेहुल चोक्सी याला भारताला थेट भारतात परत पाठवण्याची विनंती देखील कोर्टाकडे केली आहे. डोमनिका सरकारने पुढे म्हटले की, चोक्सीने दाखल केलेली याचिका सुनवणी योग्य देखील नाही. या प्रकरणी बंद न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायाधिशांनी सर्व पत्रकारांना आपले फोन बंद ठेवण्यास सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -