Breaking News LIVE : पावसाळी अधिवेशन 7 जुलै रोजी घेण्याचा निर्णय, कोरोनामुळे 2 ते 3 दिवसाचे अधिवेशन होण्याची शक्यता
Breaking News LIVE Updates, 2 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Breaking News LIVE : सांगली : मिरज शासकीय कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांटला गळती, 6 KLक्षमतेचा ऑक्सिजन प्लांट, लीकेज काढण्याचं काम सुरू, दुसरा प्लांट असल्याने रुग्ण सेवेवर परिणाम नाही
Breaking News LIVE : आज राज्यात 29,270 कोरोनाबाधित बरे होऊन घरी तर नवीन 15,169 रुग्णांची नोंद, 285 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार , मराठा आरक्षणाचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक संपन्न, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा समाज आरक्षणावर मुख्य सचिव तुकाराम कुंटे आणि अजोय मेहता यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आढावा घेण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस मंत्र्यांची बोलावली बैठक,
सह्याद्रीवर काँग्रेस मंत्र्यांची बैठक सुरू,
मंत्रीमंडळ बैठक संपल्यानंतर नाना पटोले यांच्या उपस्थित काँग्रेस मंत्र्यांची बैठक,
पावसाळी अधिवेशन 7 जुलै रोजी घेण्याचा निर्णय, अधिवेशनाचा कालावधी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरवला जाणार, कोरोनामुळे 2 ते 3 दिवसाचे अधिवेशन होण्याची शक्यता
राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द (Maharashtra HSC 12 th Exam Canceled)होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बारावीच्या परीक्षा संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. आज 12 च्या परीक्षा संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
#BREAKING राज्यातील बारावीची परीक्षाही रद्द होणार, सूत्रांची माहिती, काही वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता #HSC
केरळातील अनेक भागात ढगाळ वातावरण झाले असून अनेक ठिकाणी पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. केरळातील १४ हवामान केंद्रांवर चांगला पाऊस होत आहे. उद्यापासून केरळात पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात सरासरी 11 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पाऊस आहे. 1 मार्च ते 31 मे पर्यंत देशात सरासरीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस तर महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा 13 टक्के अधिक पावसाची शक्यता आहे.
विजेच्या कडकडाटसह पुढील तीन तासात पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचा इशारा हवामानविभाग तज्ज्ञ होसाळीकर यांनी दिला आहे. मुंबई आणि पुण्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.
गुजरात पाठोपाठ आता मध्य प्रदेशनेही बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचं जाहीर केलंय. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही घोषणा केली आहे.
गुजरात सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. विशेष म्हणजे कालच वेळापत्रक जाहीर केलं होतं. एक जुलैपासून परीक्षा सुरू होणार होती. उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड या भाजपशासित सरकारांनीही बारावीची परीक्षा होणार म्हणून जाहीर केलं होतं. पण कालच्या मोदींच्या निर्णयानंतर सगळे तोंडावर पडले आहेत. सगळी सरकारं आता याबाबत भूमिका बदलत आहेत.
तोक्ते चक्रीवादळाचा फटका मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर देखील बसला आहे. समुद्र खवळलेला असल्याने मदत कार्यात अडचणी येत होत्या. आमदार वैभव नाईक यांनी बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देत याठिकाणी असलेल्या नुकसानीची पाहणी केली व आढावा घेतला. किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिर व भवानी मंदिरात परिसराचा आढावा घेतला. तौक्ते चक्रीवादळामुळे विद्युत पोल पडल्याने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील वीज पुरवठा 15 दिवसांनी सुरळीत झाला होता. मात्र आज स्वतः आमदार वैभव नाईक सिंधुदुर्ग किल्यावर जात पाहणी केली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसेचे एक शिष्टमंडळ बीकेसी कोव्हीड सेंटरचे डीन राजेश ढेरे यांची भेट घ्यायला आले आहे. बीकेसी कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे कर्मचारी आहेत असा आरोप मनसेने केला होता. या आरोपानंतर मनसेने ढेरे यांच्याकडून आठवडाभरात स्पष्टीकरण मागवले होते. ते न आल्याने आज मनसेचे पदाधिकारी बीकेसी कोविड सेंटरवर धडकलेत.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. अशातच फडणवीस यांच्या पाठोपाठ राषट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.
ठाणे आणि मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने देखील आज आणि उद्या रोजी शिक्षणा साठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्या साठी कोरोना लसीकरण सुरु केले आहे. कल्याण पश्चिमेकडील आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी सकाळ पासूनच विद्यार्थ्यांनी आवश्यक कागडपत्रा सह रांगा लावल्या होत्या. दरम्यान शिक्षणा साठी विद्यार्थ्यांना जुलै ते सप्टेंबर या कालावधीतच जावे लागत असल्याने शासनाने लसीच्या दुसऱ्या डोस साठी घातलेली 84 दिवसांची अट शिथिल करून ती 30 किंवा 45 दिवसांची करावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांना करोना लसीचे दोन्ही डोस घेणे सोयीचे होईल अशी मागणी केली आहे.
बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील ( म्हेत्रेवस्ती ) शिरसाई कालव्याला जाणारी पाईपलाईन सकाळी 9 वाजता अतिरिक्त दाबामुळे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया तर गेलं. त्याचं परंतु याचा फटका येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आसुन शेतकऱ्यांच्या घरात शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यात दोन दिवस या भागात पाऊस पडत आसल्याने आगोदरच शेतात पाणी, त्यात पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात गळती झाली आसुन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला कोण जबाबदार असा सवाल येथील शेतकरी उपस्थित करत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन केल्याने परभणीतील बाजारपेठ मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद झाली होती. ती आजपासून 4 जून पर्यंत खुली राहणार आहे. जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवांना आजपर्यंत मुभा होती. मात्र जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नवीन आदेश काढून 4 जून पर्यंत सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या बाजारपेठेला मुभा दिली आहे. त्यामुळे तब्बल तीन महिन्याच्या कालावधीनंतर परभणीतील बाजारपेठ फुलली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मारोड येथील लहान मुलांकडून कोविड सेटंर साफसफाई प्रकरणी जिप शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र रोठे व शिक्षक कुंदन नारोटे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तशा कारवाईचे आदेश शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिले आहेत. या आधी मारोडचे ग्रामसेवक यांचही निलंबिन केलं असून आता कारववाईची टांगती तलवार बीडीओ संजय पाटील यांच्यावर आहे.
चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प मार्गावर वाघांचा रस्ता अडवल्या प्रकरणी वनविभागाने 4 जणांना नोटीस बजावली आहे. अरविंद बंडा, संकेत वेखंडे, शालीक जोगवे आणि साहिल बेग अशी नोटीस बजावण्यात आलेल्या लोकांची नावं आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-पद्मापूर मार्गावर सोमवारी काही दुचाकीस्वारांनी दोन वाघांचा रस्ता अडवून मोबाईलने चित्रीकरण केलं होतं. वाघांचं हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर कारवाईची मोठ्या प्रमाणात झाली मागणी झाली होती.
चंद्रपूर : वाघांचा रस्ता अडवल्या प्रकरणी वनविभागाने 4 जणांना नोटीस बजावली आहे. अरविंद बंडा, संकेत वेखंडे, शालीक जोगवे आणि साहिल बेग अशी नोटीस बजावण्यात आलेल्या लोकांची नावं आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली-पद्मापूर मार्गावर सोमवारी काही दुचाकीस्वारांनी 2 वाघांचा रस्ता अडवून मोबाईलने चित्रीकरण केलं होतं. वाघांचं हे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर कारवाईची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती. वनविभागाच्या कारवाई कडे वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागलं आहे.
नांदेड शहरातील सांगवी परिसरातील रेणुकानगर येथे सकाळी फिरण्यास गेलेल्या नागरिकांना रस्त्यात हरणाचे पाडस मृत अवस्थेत आढळून आले. सदर हरीण हे पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे आले व त्या दरम्यान मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात हरिणाचा मृत्यू झाल्याची माहिती नागरिकांनी दिलीय. सदर घटनेची माहिती विमानतळ पोलिसांनी वन विभागास देऊन मृत हरीण ताब्यात घेण्यात आलेय
चंद्रपुर शहरात मान्सून पूर्व पावसाच्या सरी. सकाळपासुन रिमझिम पावसाला सुरूवात, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वाढलाय उकाडा आणि तापमान, पावसाच्या हलक्या सरींनी लोकांची उकाड्यापासून तात्पुरती सुटका
राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्त्व टिकवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबरोबर मंगळवारी (2 जून) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकार रिझर्व्ह बॅंकेच्या कायद्यात बदल करत आहे. या बदलांमुळे राज्यातील जिल्हा बँका आणि नागरी सहकारी बँकांचे अस्तित्त्व धोक्यात येणार आहे. या बँका कशा वाचवता येतील यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या मंत्र्यांच्या टास्क फोर्स नियुक्ती करण्याची चर्चा या बैठकीत झाली. तसंच या कायद्याविरोधात कोर्टात जाण्याची तयारीही दर्शवली आहे. या बँका वाचवण्यासाठी काय पावलं उचलायची, नवे कायदे करायचे का याबाबतही टास्क फोर्स चर्चा करुन निर्णय घेणार आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. परवाच मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी बारावी तसेच अशा काही महत्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत असून दहावी आणि बारावी सारख्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पालकांकडूनही होत होती. मुख्यमंत्र्यांनी देखील यासंदर्भात आपले म्हणणे मांडले होते. राज्यातही दहावीच्या परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घेतला आहे.
सीबीएसई पाठोपाठ आता आयएससी 12 वी बोर्डाच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. निकाल कसा लावणार याबाबत निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बेठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्य व इतर तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
पार्श्वभूमी
सीबीएसई पाठोपाठ आता आयएससी 12 वी बोर्डाच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. निकाल कसा लावणार याबाबत निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बेठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्य व इतर तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
सीबीएसई परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या पैलूवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये चिंता आहे, ती संपवली पाहिजे. अशा तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेस भाग घेण्यास भाग पाडले जाऊ नये म्हणून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभमीवर राज्य सरकार दहावीची परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम असताना परीक्षा घेण्याचा याचिकाकर्त्यांचा हट्ट का? राज्यात कोरोनाचा धोका असताना आम्ही आमच्या विशेष अधिकारात ही परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावेत का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी उपस्थित केला. राज्य सरकारनं नुकताच या परीक्षा रद्द करण्याचा नव्यानं अध्यादेश जारी केल्यानं या याचिकेत दुरूस्ती करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाकडे मागितली. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं ही परवानगी देताना परिक्षा का घेतली जावी? याबाबत याचिकेत सविस्तर मुद्दे उपस्थित करण्याचे निर्देष देत सुनावणी गुरूवार 3 जूनपर्यंत तहकूब केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीच्या परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना थेट दहावी पास प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेत अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेशावर आक्षेप घेत पुण्यातील सेवानिवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांच्यावतीने अॅड. उदय वारूंजीकर यांनी याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली. राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याच्या निर्णायवर ठाम असल्याचं सांगत त्यासंदर्भात अतिरिक्त प्रतिज्ञापात्र कोर्टापुढे सादर केल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली.
तसेच राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरीही धोका अद्याप शमलेला नाही तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात राज्यातून एसएससी (14 लाख), सीबीएसई (22 लाख), आयसीएसई (10 लाख) आणि इंटरनॅशनल बोर्डचे (2 हजार) विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. ही संख्या लक्षात घेता परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांसह पालक, शाळा, प्रशासन यासर्वांरच अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कोरोना काळात ह परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं महाधिवक्ता यांनी हायकोर्टाला सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -